एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते. […]
आपण प्रत्येकजण ठरवीत असतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आपण जबाबदारीने राहावयास हवे की नको. जितकी जास्त जबाबदारी आपण पेलू, तितका जास्त शोध आपण त्या गोष्टीचा घेवू, तेवढेच आपले जीवन जास्त खुलेल. अशाप्रकारे जीवनाला दिल -खुलासपणे सामोरे जाणे, आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपली मागणी करणे, दुस-यांना कमी न लेखणे, दुस-यांना दोष न देणे, तसेच आपल्यामध्ये असलेले आपले स्वत:चे दोष ओळखणे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे ही तत्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारल्यास आपण आपले ध्येय गाठण्यात निश्चितच यशस्वी होवू. […]
सांग मी नसेल तर काय करशील.. कोणाच्या नजरेत पाहशील, कोणाच्या आठवणी जपशील, कोणाची मैत्रीण म्हणुन मिरवशील, सांग मी नसेल तर काय करशील.. कोणाचे लाड़ पुरवशील, कोणाचे गालगुच्चे घेशील, कोणाला तु माझाच आहेस असं म्हणशील, सांग मी नसेल तर…. बाईकवरुन फिरताना कोणाच्या खांद्याचा आधार घेशील, कोणासोबत चाँकलेटचा अस्वाद घेशील, सांग मी नसेल तर…. समुद्रकाठी फिरताना कोणाचा हात […]