छोटीसी बात……. मित्र पालक
रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच.
[…]
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच.
[…]
‘तो’ म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा… मोजकेच कपडे परिधान करत जा… केस कशाला वाढवतेस…. केस तू कापलेच पाहिजे. असा ‘त्याचा’ हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर ‘एकत्र’ आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् ‘ती’ मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला ‘तो’ सांगतो, तसं करावंच लागतं….
[…]
असेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा. […]
तू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन. मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस! […]
संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात त्यांचा आज जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याचरणी कोटी कोटी प्रणाम. […]
कमिशनरसाहेब जेवायला बसले. नोकरानी ताट आणि पाणी पुढे आणुन ठेवले. ताटात फक्त साध वरण आणि भात होता. हल्लीहल्ली त्यांना ताज इंटरकॉंन्टिनेंटलमधले जेवण पचत नसे. लगेच डायरिया व्हायचा. त्यामुळे महिन्याभरापासुन त्यांनी फाइव्ह स्टार हॉटेल , इंटरनॅशनल रेसिपिज , लेट नाइट पार्टीज , चिअरलीडर्स सर्व काही बंद केले होते. सकाळ संध्याकाळ फक्त साधं वरण आणि भात. तेवढ्यात कमिशनरीणबाई […]
जीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं.
[…]
भगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते.
[…]
श्रीभगवान म्हणतात, ‘दुःखाचं मूळ तुमच्यातच आहे आणि आनंदाचा झराही आतूनच उगम पावतो. आनंदाची उधळण करायची की दुःखाचे आवेग वाढवायचे हे जो तो ठरवितो.’
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions