नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

पाणी

माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात […]

नमस्कार

  नमस्कार करणं याला भारतीय संस्कृतीमध्ये प्रदीर्घ परंपरा आहे. नमस्काराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तेवढेच अर्थही. लहानपणी वडिलांकडे सातत्यानं माणसांचा राबता असायचा. दृष्टिभेट होताच सहजपणे ओठावर यायचं रामराम. अभिवादनाचा आणखी एक आविष्कार. मी लहान होतो; पण वडिलांकडे येणारी मंडळी मलाही म्हणायची रामराम. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून रामराम म्हणायला हवं; पण त्याचा सराव नव्हता. अनेक वेळा त्यावरनं […]

अपघात

  अपघात. ज्या घटनेचं नियोजन करता येत नाही, अशी घटना. वृत्तपत्राच्या दृष्टीनं अपघात म्हणजे एक बातमी. अपघात कसा घडला, कोठे घडला, कोणाला घडला यावरून त्या बातमीची लांबी-रुंदी ठरणार. मी कधी काळी वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात क्राईम रिपोर्टिंग करायचो. अपघात आहे, असं कळलं की फेटल आहे का? असा निर्विकार प्रश्न असायचा. अपघात मोठा असेल, तर त्याचं वर्णन कसं द्यायचं, […]

चष्मा

  परवाच जागतिक महिलादिन साजरा झाला. विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. महिलांची प्रगती आणि समस्यांवर चर्चा झाली. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीनं आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमाला मी हजर होतो. आरोग्यविषयक प्रश्नांबाबतची जागरुकता, असा चर्चेचा विषय होता. भाषणं झाली. महिलांनी स्वतःची काळजी कशी अन् किती घ्यायला हवी, हे सांगण्यात आलं. त्या वेळी माझ्या मनात एक आठवण आली. तिथंही सांगितली, […]

दुःख? कोठे आहे?

  आपण आनंदाचा विचार करतो त्या वेळी खरे तर विचार दुःखाचा असतो. दुःख आहे म्हणूनच आनंदाचा शोध आहे. प्रश्न असा येतो की, माणूस दुःखी का होतो आणि माणूस आनंदी तरी का होतो? मध्यंतरी माणसाच्या आनंदाच्या, समाधानाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेत एक पाहणी करण्यात आली. माणसाकडे खूप पैसे असले की आनंदाची साधने त्याला खरेदी करता येतात, असा […]

सदिच्छा

सदिच्छा. एक शब्द. भावना व्यक्त करणारा. सद्-इच्छा, चांगली इच्छा, काय बळ आहे या शब्दात? अनेक वेळा प्रश्न पडतो.
[…]

गंमत

  परदेशात जाणं ही बाब आता काही खूप मोठी राहिलेली नाही. रोज हजारो-लाखो लोक भारतातून अन्य देशांत जातात आणि येतात; पण कधीकाळी त्याची अपूर्वाई होती. परदेश प्रवासाहून जाऊन आलेला माणूस त्या वेळी जी भाषा बोलायचा, तीही सर्वसाधारण सारखीच होती. प्रगत देशातले रस्ते, वाहने, तेथील शिस्त, स्वच्छता या गोष्टी गप्पांचं सूत्र असायच्या. आता काळ बदललाय. आता भारतात […]

1 510 511 512 513 514 515
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..