किस्ना पेंटर मंजे एक दिलदार अन तितकचं अवली व्यक्तीमत्व व्हतं.कुंचल्यानं जसे चित्रात रंग भरायचा तसेच जिवनात बी रंग वतायचा.त्यामुळं त्याचा गोतावळा लय मोठा व्हता.कुंचल्याच अन त्याच्या हाताचं एवढं घट्ट नातं व्हतं की त्यानं काढलेली चित्र अक्षरशः जिती व्हयाची.असा हा अवलीया जिथ जायचा तिथं रंग भरायचा.. […]
गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे. […]
गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे.. […]
‘कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा. […]
या गाण्याच्या ओळी अनेकांच्या मनाला भावणाऱ्या आहेत. घर कसेही का असेना, ती झोपडी असो वा बंगला, की अजून काही…; त्या घरात वास्तव्यास असणाऱ्या माणसासाठी ते घर विशेषच असते. कोणतेही घर असो, ते अनेक गोष्टींचा निश्चितच एक संचय असते. त्यात भाव-भावना, इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा या सारख्या संमिश्र भावना आणि क्रिया प्रतिक्रियांचा समावेश होतो. […]
जनमत घडविण्यात आणि ‘बि’घडविण्यातही सर्वात मोठं योगदान असतं ते प्रसारमाध्यमांचं. या माध्यमात असलेल्या या ताकदीमुळेच त्याला लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा दर्जा मिळाला. जगभरातल्या सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात प्रसारमाध्यमांची हीच भूमिका राहिली आहे. इंटरनेटचा वाढता वापर, सहज उपलब्ध होणारे स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे प्रसार माध्यमांचं सर्व गणितच बदलून गेलंय. […]
आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते . […]
अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. […]
कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही. […]
एकुणच भारतात मुद्रणाची कला सार्वजनिक होत गेली आणि त्या सोबत प्रसार माध्यमांचा ‘प्रसार’ होण्यास सुरवात झाली. पहिली १५० वर्षे प्रसार माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके असंच स्वरूप होतं. १९८० नंतर आपल्याकडे दूरदर्शनचे जाळे पसरू लागले. २० व्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी खासगी दूरदर्शन वाहिन्यांची सुरुवात झाली. २१ व्या शतकात पहिल्या दशकानंतर सामाजिक माध्यमं (सोशल मिडीया) सुरू झाली. […]