संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची. […]
अनेकजण सागतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात. […]
माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे. […]
“स्वतःचं अस्तीत्व म्हणजे काय…? प्रणय 19 वर्षांचा असतांना आपल्या गरीबी परिस्थितीमुळे साधं B.sc. ला ज्या काॅलेजला अॅडमीशन घेऊ शकला नव्हता…त्याच काॅलेजला आज वयाच्या 24 व्या वर्षी प्रणयच्या एका शब्दावर…एका काॅलवर अॅडमीशन दिलं जातं….काही गरजू, गरीब मुलांची फी सुद्धा प्रणय स्वतःच भरतो….गरीब मुलांनी शिकावं म्हणून प्रयत्न करतो….. इतक्या कमी वयात यापेक्षा चांगली स्वतःच्या अस्तीत्वाची दुसरी Definition तरी काय करता येईल……” […]
लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात. […]
भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत. […]
कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. […]