साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 1
साधारणत: असे मानले जाते की, उत्तर दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंब बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अवतीभोवती असलेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश. बृहन्महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या १८ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे. […]
शक्ती संस्कारांची, आदर्शाची !
सकाळी उठताना दोन्ही हातांचे तळवे समोर ठेवून आई म्हणायला सांगायची, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमूलेतु गोविंद, प्रभाते करदर्शनम् । जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमस्कार करायचा. त्यानंतर वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुम् ।’ असं म्हणून उठायचं. […]
शुभं करोति
तेव्हा तिन्हीसंध्याकाळ शांत असायची. हळूहळू ज्योत मालवत जावी तसा सूर्यप्रकाश सरत चाललेल्या डोळ्यांना जाणवायचा आणि कुणा राजमंदिरातल्या दासीनं एकेका महालात एकेक दीप उजळावा तसं एकेक नक्षत्र आभाळात उजळत चालेलंही दिसायचं. दिवस उन्हाळ्याचे असतील तर सुखद आणि हिवाळ्याचे असतील तर बोचरे वारे देहाला स्पर्श करायचे. मनसोक्त मातीत खेळून आल्यावर हात-पाय धुऊन मुलं देवघरासमोर ‘शुभं करोती’ म्हणायची. […]
कैवल्यतेजाची शालीनता!
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला एक अद्भुतरम्य चमत्कार आहे. चमत्कारंच! त्यांचं भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद वदवून घेणं हे चमत्कार कुणी श्रद्धेनुसार मानावेत वा न मानावेत.. सोळाव्या वर्षी एखादी व्यक्ती गीतेवर इतकं रसोत्कट, सखोल आणि सामान्य सकळांना आपलंसं वाटणारं, जीवनोद्धार करणारं भाष्य लिहिते, अभंग रचते, अखिल विश्वासाठी पसायदान मागते, वारकरी पंथाचा पाया रचते, एकविसाव्याच वर्षी संजीवन समाधी […]
टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आजचा भारत
ब्रिटिश भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने ! इथला पैसा त्यांनी तिकडे नेला, ते आणखी श्रीमंत झाले आणि पैशाच्याच बळावर ब्रिटिश आपल्यावर राज्यसुद्धा करू लागले ! भारतात पिकणारा कच्चा माल संपन्न असला तरी त्या मालावर इथेच प्रक्रिया होऊन हिंदुस्थानात उद्योगांचे जाळे उभे करणे मात्र ब्रिटिशांना पसंत नव्हते. […]
गणेशोत्सव २०२३ – गणपती बाप्पा मोरया!
नारायणाच्या अंगात जसं लग्न संचारत ना तसं माझ्या अंगात गणेशोत्सव संचारतो. एरवी सण- सनावळीच्या बाबतीत निष्क्रीय किंवा अजगरासारखी सुस्तावलेली मी, गणेश चतुर्थी तोंडावर आली की कुठून हरिणाची चपळता आणि उत्साह येतो अंगात हे त्या गणोबालाच माहीत! प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हा उत्साह संचारतो. […]
माझी ऊर्जा
कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते. […]
साथ
प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती. […]