भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून, तळागाळातल्या समाजाचा विचार करून स्त्रीसक्षमीकरणाला प्राधान्य देऊन आकाशवाणीचे कार्यक्रम केले जातात. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आणि चित्रपट संगीत हा तर आकाशवाणीचा आत्मा आहे. अनेक दिग्गज कलाकारांची ध्वनीमुद्रणे, अभिजात रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्य रूपांतर आकाशवाणीच्या संग्रहात आहेत. जेव्हा जेव्हा आकाशवाणीच्या संग्रहातल्या या कार्यक्रमांचे प्रसारण होतं तेव्हा ती खरं तर श्रोत्यांच्यासाठी मेजवानी असते. […]
घरची स्त्रीच घराला घरपण देत असते… आज्जीच्या प्रसन्न स्वभावाने कोकणातलं घरही सदैव समाधानाच्या सरींत भिजत राहिलं… पैशांची श्रीमंती असली म्हणजेच माणूस मणभर सुखी होतं नसतो… जे मिळालं आहे त्यात संतुष्टता आणि समाधान मानलं तरच मन भर सुख त्याला मिळतं… […]
विद्यार्थी दशेपासूनच मला वाचनाचा सातत्याने नाद आहे. गेल्या पंचावन्न छपन्न वर्षात मी वाचून काढलेल्या पुस्तकांची संख्या पाच हजारापर्यंत जाईल. योगायोगाने मला दैनंदिनी ठेवण्याची सवय लहानपणा-पासूनच लागली. कोणतेही पुस्तक वाचून झाले की, मी पुस्तकाचे नाव, तारीख, विषय याची काळजीपूर्वक नोंदणीं लागलो. याबाबतीत माझी पहिली नोंद वयाच्या सोळाव्या वर्षी आहे. […]
वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही. […]
…..आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह स्वतःची समाजाप्रती असलेली उपयोगिता सिध्द केली पाहिजे. माध्यम आणि माध्यमकर्मींनी प्रसारमाध्यमातील व्यापार आणि हितसंबंध यापलीकडे जाऊन आपली उपयोगिता सिद्ध केली पाहिजे. असे झाले तर माध्यम जनसामान्यांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होतील. […]
साहित्य संमेलन हे एक महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रंथकारांनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करावी, कांनी ग्रंथ विकत घेण्याची हमी द्यावी, मराठी भाषा वीना अवगत होण्याचे प्रयत्न करावेत यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी ११ मे १८७८ रोजी प्रथम ‘ग्रंथकार संमेलन’ पुण्यात भरविले होते. हे ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजेच आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आणि कालप्रवाहात निर्माण झालेल्या प्रांतिक, उपनगरीय, दलित, ग्रामीण, बालकुमार, नवोदित, होतकरू व अलिकडेच साक्री येथे झालेले दलित, आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन या सर्वोची गंगोत्री आहे. […]
पंचामृत स्नानं समर्पयामि ’गणपतीची पूजा असो सत्यनारायणाची पूजा असो की त्या षोडषोपचार पूजेत पंचामृताचा वापर असतोच असतो. देवाला नैवेद्य म्हणून आपण पाच फळे ठेवतो. व पूजेनंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो. पण या सगळ्याच्या मागे आपल्या शास्त्राचा इतका सखोल विचार व अभ्यास दडला आहे हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. […]
साहित्यिक – ठाणे आणि नवे या संबंधात मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा आदराने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे श्रेष्ट साहित्यिक महाराष्ट्र सार-स्वतकार वि. ल. भावे (१८७१-१९२६) यांचेच नांव मला सर्वप्रथम आठवले. संत वाङ्मयासंबंधी त्यांनी केलेले संशोधन व त्या आधारे लिहिलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मौलीक ठेवा आहे. […]
सर्वप्रथम वसन्तरावांचे त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल नाट्य-वेड्या त्यांच्या चाहत्यांच्यावतीने व निर्मात्यांच्यावतीने अभिनंदन करणं महत्वाचं आहे. त्यांचं अभिनंदन करून मगच मला वाटलेले म्हणा किंवा पटलेले म्हणा वसन्तराव कानेटकर ह्यांच्याबद्दल माझ्या लेखणीला पेलवेल असे चार म्हणा किंवा चारशे म्हणा शब्द लिहायचं मी ठरवलं. […]
शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे. […]