मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे. […]
मी दी सांगली बँक लि. अंधेरी शाखेत टेलर ह्या पदावर कार्यरत होते. टेलरला पाच हजार रुपयेपर्यंतच ग्राहकाला पैसे देण्याची परवानगी होती. आमच्या बँकेत आणि प्रथम अंधेरी शाखेतच ही टेलर पद्धत सुरू झाली होती. मीही टेलरच्या पदावर नवीनच होते. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून विड्रॉलचे, चेकचे आधी लेजर पोस्टिंग करून माझ्याकडे पेमेंटला येत असे. […]
स्टेट बँकेत 1984 साली नगर जिल्ह्याचा श्रीरामपूर शाखेत कॅश ऑफिसर म्हणून माझी बदली झाली. शाखा बऱ्यापैकी मोठी, जवळपास सहा-सात साखर कारखाने असलेली ही शाखा. अर्थातच कॅशचे व्यवहार मुबलक प्रमाणात व्हायचे. त्यातून त्या वेळेस चिल्लरची (अगदी 10-20 पैशापासून 1 रुपयापर्यंत) कमतरता खूप जाणवायची. […]
मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ? […]
गुणी, समंजस आणि कर्तुत्ववान-समाधानी पतीची साथ, हे माझं सौभाग्य! सुसंस्कृत, कलासक्त माणसांनी भरलेला सासर परिवार, हे माझं सौभाग्य! उत्तम जाणकार आणि विवेकी मित्रपरिवार, हे माझं सौभाग्य! आस्वादक व चोखंदळ वाचक लाभणं हे माझं सौभाग्य!!!! म्हणून म्हणते आहे मी स्वतःला सौभाग्यवती!! तेव्हा कृपया ते सौ. लिहिलेलं खोडू नका!’ […]
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झालाय, की त्याला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तर दूरच राहिलं. सध्या तो ज्या प्रकारच्या आयुष्यातून प्रवास करतोय किंवा ज्या प्रकारचं आयुष्य जगतोय, ते त्याला मान्य नसलं तरी ते जगण्याला तो बांधील आहे. आपण अनेकदा वर्तमानपत्रातून वाचलेलं आहे की, […]
सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं. कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती . […]
आपुलकी म्हणजे आत्मीयता , ओढ ,जवळीकता , प्रेम , आस्था की जी सर्व नात्यामध्ये असते. आणि या आपुलकीचे महत्व हे श्वासा इतकेच लाघवी आणि शाश्वत असून महत्वाचे असते. […]
आता प्रत्येक बँकरच्या तोंडी एक वाक्य कायम असतं म्यॅन्यूअल बँकिंगची मजाच वेगळी होती, कुणावर अवलंबून रहावे लागत नव्हते, कनेक्टिव्हिटी, रेंज, सॉफ्टवेअर अपडेशन, लॉग इन, असे कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. पूर्वीचे टेलर तर घरापासूनच काम सुरू करायचे, येता येता त्यांना कुणीतरी खात्यात पैसे भरायला द्यायचं, कुणी विड्रॉल द्यायचं, त्याला लगेच पैसे मिळायचे, बँकेत जाता जाता लोक सरकारी चलन भरायला द्यायचे, अशी कितीतरी कामं सुरळीत पार पडायची. […]