मन भरून येणारी सैर ही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात, “फ्लॉवर कोबी नीट बघून […]
2003 च्या 19 नोव्हेंबरला माझी पदोन्नती होऊन मी महाराष्ट्र बँक श्रीवर्धन शाखेत लिपीक म्हणून जॉईन झालो. खरं तर श्रीवर्धन हे एक रम्य ठिकाण आहे. निळ्याशार समुद्रकिनारा व दांडा ते जिवना बंदरपर्यत पसरलेला वाळूचा किनारा! बाजूला नारळी, पोफळीच्या बागा व केवड्याचे बन. डिसेंबर महिना संपत आला व थंडीची गार हवा शांत झोप लागते. मी बँकेच्या समोरच्या यादव […]
कोणत्याही आईला आपलं मूल हे गोरं किंवा काळंबेद्रं असलं तरी ते सर्वांत प्रिय असतं. मग तो मुलगा असो वा मुलगी. खेड्यातील असो वा शहरातील. तिची मानसिकता एकच असते, आपल्या मुलाला कुणाच्याही वाईट ‘नजरे’ची दृष्ट लागू नये. दृष्ट लागणे, ही गोष्ट आजच्या पिढीला अंधश्रद्धा वाटू शकते. […]
‘पान खायो सैंया हमार’ किंवा ‘खाईके पान बनारसवाला’ अशा गाण्यांची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करायचा असेल तर जुन्या काळात थोडेसे डोकावले पाहीजे. सतरंजी तक्क्याने सजलेली बैठक, मध्यभागी पितळेचा पानपुडा, अडकित्ता, चुना, कात, सुपारी, लवंग, विलायची, हे घराघरात हमखास दिसणारे चित्र. […]
ही साधारण तीस वर्षांपूर्वीची युनायटेड वेस्टर्न बँक, अंबरनाथ शाखेतील (आताची आयडीबीआय बँक) घटना आहे. पहिला आठवडा व दिवाळी लगेच असल्यामुळे बँकेत गर्दी होती… बचत खात्यातील खातेदार काऊंटरवर टोकन घेऊन कॅशियर समोरील जागेत बसून आपला नंबर येण्याची वाट पहात होते. […]
बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती. […]
पुढच्या काळात धोका नामशेष झाला, 501 बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली. कपड्यांचं टिकाऊपण कमी झालं. त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं. मग खराखरा चालणारे प्लास्टिक ब्रश आले. घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या ग्रिलमध्ये स्टील दांड्यावर कपडे वाळत पडू लागले. […]
पोस्टऑफिसउघडआहे ! या पोस्टचा जिकडेतिकडे समाज माध्यमावर धुमाकूळ सुरू दिसला. मला या “उघड्या पोस्ट ऑफिस ” चा काही केल्या लवकर उलगडा होईना .यावर काही आचरट विनोद ही आले. आचरटच विनोद लोकांना भारी वाटतात .पण हे सभ्य लोकांना बोलता येत नाही. तेही जाहीरपणे ? बर ते जाऊ द्या ! हा सगळा घोळ झाला तो माझ्या घरचा टीव्ही […]
मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो टायपिस्ट म्हणून व निवृत्त झालो अधिकारी म्हणून. पूर्ण कारकिर्दीत पगाराच्या पाकिटातून आलेल्या नोटा सोडल्या तर मला ऑफिसमध्ये कधीही नोटा हाताळाव्या लागलेल्या नाहीत; असं मी सांगितलं तर जसा इतरांचा विश्वास बसत नाही त्याप्रमाणे तुमचाही बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, एवढं मात्र खरं. […]
समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते. क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात. समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही. […]