मी कुर्ला शाखेत असतानाचा एक किस्सा.. मी नुकतीच बँकेत लागले होते, प्रोबेशन काळात संपात सहभागी होता येत नाही…अश्याच एका संपाच्या दिवशी मी, कॅशियर आणि एक वरिष्ठ अधिकारी एवढेच लोक उपस्थित होतो. फक्त रोख रकमेचे व्यवहार चालू होते म्हणून तुरळक गर्दी होती, ह्या शाखेत एक पेट्रोल पंपाचे खाते होते. […]
अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले. […]
माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीच्या दिवशी मला ‘चिमणी’ची न चुकता आठवण होतेच. कमर्शियल जाहिरातींची कामं करताना अनेक स्त्री-पुरुषांशी संपर्क आला. कामानिमित्तानं आलेला हा संपर्क, कुणाशी काही दिवसांचा तर काहींशी अनेक वर्षांसाठी असायचा.
रमेश, वेलणकरांकडे कामाला असतानाची गोष्ट आहे. […]
मॅडम सी.जे. वॉकर ही आपल्या कंपनीची एकमेव मालक आणि अध्यक्षही होती. तिच्या उद्योगजगताचे साम्राज्यच तिने वाढवून ठेवलेले होते. या साम्राज्यात कारखाना, वॉकर कॉलेज ऑफ हेअर कल्चर आणि ‘मेल ऑर्डर बिझिनेस’ वा पोस्टातर्फे व्यवसाय यांचा समावेश होता. संपूर्ण अमेरिकेत तिचे एजंटस् सौंदर्यप्रसाधनांचे प्रात्यक्षिक दाखवीत विक्री करीत फिरत होते. […]
अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट…. […]
आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा. […]
आपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही. […]
आरवाईन जवळ लेकफॉरेस्ट भागात अनुपने-माझ्या मुलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी घर विकत घेतले. त्याच्या दोन्ही बाजूंना अमेरिकन कुटुंबं होती. त्यापैकी उजवीकडे एक म्हातारे जोडपे. या भागात अनेक बंगल्यांमधून म्हातारी माणसंच राहातात. […]
मनोहर राजाराम कुळकर्णी म्हणजे माझा कुणी भाऊ नाही किंवा कुणी मित्रही नाही , तर ते होते माझे सख्खे काका. आता ते चांगले, म्हणजे डोक्यावर परिणाम होण्यापूर्वीचे मला बरेचसे अंधुक आठवतात. […]
महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग म्हणजेच राज्यालाच नव्हे तर देशालाही स्वर्गीय अनुभव देणारा असा हा भाग आहे. या भागास जैव विविधतेसह विशाल सागर लाभलेला आहे. निसर्ग संपन्न असा या भूप्रदेशात कुणालाही वास्तव्य करण्याची व या निसर्गाच्या अलौकिक साक्षात्काराची अनुभूती घेण्याविषयी आकर्षण वाटावे. यादृष्टीने दर्शनिका (गॅझेटिअर) विभागाने या भागातील विविध जिल्ह्यांचे दर्शनिका (गॅझेटिअर) बनविण्याचे काम हाती घेतले आहे. […]