नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. […]

फोटो झिंको

शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती. इतक्यात एक क्लार्क केबिनमध्ये आला, त्याने विचारले की, साहेब तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहात? माझी […]

कॅश व्हॅन

मी आणि माझी बायको दोघेही बँकर. म्हणजे नोकरी बँकेत होती. बायकोची केशिअर कम क्लर्क अशी हायब्रीड पोस्ट. बँक ऑफ इंडिया. 25 वर्षांपूर्वीचा अनुभव. एखाद्या ब्रँचला थोडे दिवस रुळलो की ती शाखा तिथले कर्मचारी, तिथले काम आणि तिथले ग्राहक चांगले वाटायला लागतात. अशावेळी बदली झाली की विनाकारण पोटात गोळा येतो. बापरेऽऽऽ नाविन्याची मनात थोडीशी भीतीच असते. कदाचित […]

मनाने कोकणवासी झालो

मी मूळ सोलापूरचा. सोलापूरजवळ नळदुर्ग म्हणून गाव आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात तिथे माझा जन्म! कोकणामध्ये माझा पहिला प्रवास झाला तो गोव्यावरून परत येताना मित्रांसमवेत आणि ती पहिली ओळख माझी कोकणची! त्यानंतर हेदवीला आमचा एक प्रयोग होता नाटकाचा, त्या निमित्त कोकणात उतरून असा पहिला प्रवास झाला. हळूहळू कोकणाशी संपर्क वाढला. त्यानंतर माझे सासरेबुवा कोकण रेल्वे मध्ये होते, त्यामुळे […]

कुराण शपथ

या गोष्टीला झाली आता बारा वर्षे. मी त्यावेळी बँकेत दादर मुंबई येथे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होतो. दिवाळी जवळ आली होती. खातेरदारांची पैसे काढण्याची गर्दी रोज होत असे. […]

कसबा संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. ‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, […]

लाखांची गोष्ट

शहरामध्ये बँकांचे आपसातील व्यवहार जेथे चालतात, त्याला समाशोधनगृह (Clearing House) म्हणतात. बँकेचे ग्राहक विविध बँकाचे चेक, डिव्हिडंड वारंट (Dividend Warrant), ड्राफ्ट वगैरे त्यांच्या खात्यात जमा करावयास देतात. ते चेक, डिव्हिडंड वारंट वगैरे त्या त्या बँकेला देण्यात येतात. ती बँक ते चेक, डिव्हिडंड वारंट ज्यांचे आहेत, त्यांच्या खाते नावे टाकतात. आणि ती रक्कम ते देणाऱ्या बँकेच्या खात्यात जमा करतात. […]

मिले सूर मेरा तुम्हारा….

मला हा लेसन शिकवशील का? आणि धडा काढून दाखवला.नातवानं तो तर शिकवलाच आणि ते नेमके कोणते गाणे होते हे त्याला दाखवायला सांगितले आजोबांना. अभ्यासक्रमात काही धडे वेगवेगळ्या कारणांमुळे निवडलेले असतात. […]

तेथे कर माझे जुळती

सिंगापूर सरकारने अनेक उत्तम योजना राबवत ज्येष्ठ नागरिकांचे महत्व राखले आहे आणि म्हातारपण हे सुखकारक होण्यासाठी हातभार लावला आहे. हा लेख लिहिण्याच्या निमित्ताने मी सिंगापूरचे ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे कायदे आणि नियम तपासले. सिंगापुरात कायद्याने 60 वर्षाची व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. […]

1 82 83 84 85 86 516
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..