नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

‘लॉटरीचे तिकीट’- स्वप्न आणि इच्छा पूर्ती!

….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या  दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी  लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले . […]

कोणाच्यो म्हशी?

चांगदेव आणि कुटूमातली सगळीजणा म्हशीक  हाकीत हूती तरी म्हस जाग्यावरना हलत नाय हूती. चांगदेवान जावन बेडरूमातना भायर पडणारा दार उघडल्यान आणि म्हशीक हाकूक लागलो तरी म्हस जावक मागना. लय येळ प्रयत्न करून पण म्हस जागची हलना. अकेरेक चांगदेवान गाव गोळा केल्यान. संत्याकडे निरोप धाडल्यानी.संत्याची लाली म्हस मारकुटी हूती ती उभ्या गावाक म्हायती. म्हस बेडरूमात गेली कशी हेच्यावर चर्चा रंगली. […]

आणखीन एक

दुपारची वेळ, डोळ्याला डोळा नुकताच लागला होता. नको त्या वेळेस घणघण्याची फोन ची सवय. सवयीप्रमाणे तो घणघणलाच. कुस बदलून घेतला. ओळखीचा नंबर नव्हता. माझ्या सारख्या छोटया पडद्यावरच्या अभिनेत्याला सुद्धा असे unknown number घेणे आवडत नसते, ego issue म्हटले तरी चालेल. पण गेले कित्येक दिवस घरात बसून कंटाळलोच होतो. विचार केला, जरा वेळ चांगला जाईल आणि फोन […]

अनुभव

पावसाळी सकाळ होती. माधवी घाईने बँकेत शिरली. कामाला भिडणार तेवढ्यात तिला साहेबांच बोलावणं आलं. शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी नॉमिनेशन नाही अशा अकाउंटस्ची एक मोठी लिस्ट तिच्या हातात ठेवली. नॉमिनेशन नसेल तर डेथ क्लेमसाठी ग्राहकांचा वेळ व पैसे खर्च होतात. […]

नातं जपताना

शेजारपाजारच्या माणसात मिसळण्याची त्यांच्या अडीअडचणीला मदत करण्याची देखील सवय लावून घेतली पाहिजे. पेराल तसं उगवतं या न्यायाने हीच माणसं पुढे जाऊन तुमच्या उपयोगी पडणार असतात. स्वत:ला कशात न कशात कायम बिझी ठेवलं पाहिजे आयुष्यातले दुःखाचे क्षण आठवण्यापेक्षा आनंदाचे क्षण आठवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. थोडक्यात येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करत स्ट्रेस न घेता नेहमी आनंदी राहता आलं पाहिजे. […]

सुभाषित रत्नांनी – भाग ३

या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात. […]

शोध

आम्ही दोघे रात्री बारा वाजता शिडीने कौलावर चढलो व शेजारच्या वाड्यात बघू लागलो. शुभ्र चांदणे असल्यामुळे सगळे नीट दिसत होते. खणण्याचे आवाज जोरात येत होते पण बाकी काहीच दिसत नव्हते. अशी पाचेक मिनिटे गेली असतील आणि अचानक एक गाईचे पांढरे वासरू या खोलीतून त्या खोलीत जाताना दिसले. आता इतक्या रात्री वासरू तिथे येणे शक्यच नव्हते. आमच्या दोघांच्या अंगावर सरसरून काटा आला. खरे तर आमची बोबडी वळली होती. […]

नकोशी !

स्वतःला उच्च स्थानावर नेण्याची ती किंमत असते. तुम्ही कळपाचे राहात नाही आणि कळपाची गरजही संपलेली असते. परिघाबाहेर तुम्हांला टाकून वर्तुळ स्वतःला सांधून घेत असते. […]

मी तू पणाची….

मी रोजच जय जय स्वामी समर्थ आणि जय शंकर महाराज यांची मालिका बघते ऐकू येत नाही पण ओठांच्या हालचाली वरून समजून घेते. प्रसंग असा एका माणसाचे दैन्य दूर करण्यासाठी तो शंकर महाराज यांच्या कडे येतो आणि विचारतो की माझे दैन्य कधी संपणार? ते म्हणतात की मी मेल्यावर तुझे दैन्य संपेल. मी आवाक झाले. पुढे त्याचे दैन्य कसे संपते हे कळते. […]

1 83 84 85 86 87 516
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..