सोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले.. […]
माझा अत्यंत लाडका मित्र, प्रचंड कष्ट घेत घेत जेव्हा एक प्रतिभा संपन्न अभिनेता म्हणून मला मोठ्या पडद्यावर दिसला, तेव्हा त्याचा खूप अभिमान वाटणारी मैत्रीण म्हणून मला त्याला हे पत्र लिहावंसं वाटलं…आपल्या माणसांचं कौतुक करण्याची संधी कधीच सोडू नये असं मला नेहमी वाटतं..आपल्याला त्यांच्या बद्दल काय वाटतंय हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवावं..’व्हिक्टोरिया’ हा मराठीतील एक दर्जेदार भयपट अलिकडे […]
रायपूरला असताना माझ्या सहकाऱ्यांसमवेत “अमरकंटक ” येथील नर्मदेचा उगम मी पाहिला आहे पण मला व्यक्तिशः नर्मदा परिक्रमा करावी असे वाटत नाही. बसने नाही आणि कोणाबरोबरही नाही. एकट्याने बघू, कधी जमलीच तर ! तोवर हे पुस्तक आहेच की नर्मदास्नानाची अनुभूती देणारे ! […]
एमेलियाने दोन हजार सव्वीस मैलांचा अॅटलांटिकचा विमानोड्डाणाचा प्रवास फक्त चौदा तासांत केला होता. या चौदा तासांत झोप वा डुलकी लागू नये म्हणून तिने ‘स्मेलिंग सॉल्टचा वापर केला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या तिने टोमॅटो सूप म्हणून सेवनामुळे सुस्ती येऊ नये म्हणून वा झोप येऊ नये थर्मासमधून व डब्यामधून सोबत नेले होते. […]
आभाळ भरून आलं. कोणत्याही क्षणी तो कोसळेल असे वातावरण. सगळीकडे काळोख दाटला. अधून मधून वादळाची चाहूल. आणि मंदाताई बेडवर टेकून बसून बघत होत्या. हेडफोन लावून गाणी ऐकत होत्या. का रे दुरावा. का रे अबोला. आणि मागील सगळेच आठवायला लागले. […]
आदिमानवाच्या काळात माणूस जंगली प्राण्यांप्रमाणे मुक्त रहात होता. भटकंती करताना कंदमुळं खात होता. कालांतराने प्रगती झाली. तो व्यवस्थित जेवण करु लागला. ऋषिमुनीं आपल्या कुटीमध्ये मांडी घालून पत्रावळीवर भोजन करु लागले. रामायण, महाभारतातसुद्धा मांडी घालूनच सर्वजण भोजन करीत होते. […]
साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती. […]
१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला. […]