नवीन लेखन...

ग्यानबाची मेख

ग्यानबाची मेख….!!! कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं, कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं, कपडे काढायची अन फाडायची जणु, चषकी स्पर्धाचं लागली आहे…..!!! शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत, शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म, कॅमेर्‍यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय, हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय…!!! आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं… कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय, पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय, न्यायी धर्मराजा […]

व्रत मौनाचे

आता सरु लागले आयुष्य हे सारे तरीही तुझे मौन मात्र संपले नाही… कसला हा असा दैवयोग भाळीचा हे गूढ तुझे अजूनही कळले नाही… शब्द तुझे अजूनही कां? अव्यक्त हेच मजला अजूनही उमगले नाही… नव्हते कधीच काहीच मागणे माझे तुजवीण जगणे कधीच रुचले नाही… श्वासासंगे, तुजवरी प्रेम करीत आहे तुला कधीच विसरूही शकलो नाही… तूही हे सारे, […]

कल्लोळ

जगी भेटली माणसे अनभिज्ञ ती सारी… जोडली नाती निराशाच पदरी… नव्हता जिव्हाळा भावशून्य सारी… नाही कुणी कुणाचे छळे सत्य जिव्हारी… जखमांचे झिरपणे नि:शब्द वाहते अंतरी… असले कसले जगणे प्रीत उदास हृदयांतरी… हा कल्लोळ असह्य भावनांचे रुदन भीतरी… रचना क्र ७० १०/७/२०२३ वि.ग.सातपुते. (भावकवी)  9766544908

रेशीम नाती

जगण्याचं गाणं करणारी जगावसं वाटायला लावणारी नाती आपल्याकडे साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी हक्काचा कोणीतरी आहे असा खोल दिलासा देणारी नाती आई, मुलगी, सासू-सून, नणंद भावजय, बहिणी बहिणी आजी नात, अशीही भावभावनांचे अनेक पदर रचणारी नाती रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्यभर पुरतील अशी ही नाती भेटतात.. ती म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी, गुरु शिष्य, गुरु भगिनी कोणतेही व्यवहारिक निकष या […]

मन फुलारू

घन आषाढी, गगन सावळे मीलना आसुसलेली वसुंधरा चिंबचिंबला पाऊस ओला स्मृतींच्या झरझरती जलधारा…।। हिरवळलेली सुंदरा अनुपम माहोल लोचना दीपविणारा धुंद क्षण क्षण, मन फुलारू ऋतुवर्षाचा, सोहळा न्यारा…।। जीवा जीवाला झुलविणारा बेधुंद मृदगंधला अवीट वारा प्रीतभावनांचा स्पर्श अनावर अधिर, प्रीतासक्ती गंधणारा…।। शब्दाशब्दातुनी ओढ लाघवी अंतरात झुळझुळतो प्रीतझरा घन आषाढी, गगन सावळे मीलना आसुसलेली वसुंधरा…।। रचना क्र. ६३ […]

अनुरागी अनुबंध

हा जन्मच सारा तुझ्याचसाठी गांठ बांधलेली जन्मोजन्मीची… तुच अशी लाघवी मन प्रीतपरी उलघाल उरी अधीर स्पंदनांची… भावशब्दांची तू पावन गंगोत्री गुणगुणणारी धुन तू बासुरीची…. आत्मरंगला, आत्माराम माझा मोदे गातो गीता या जीवनाची…. हा अव्यक्त, अनुरागी अनुबंध जशी रांगोळी प्राजक्त फुलांची…. रंगगंधता जीव सारा चंदन होतो हीच कृपा कृपाळु त्या अनंताची रचना क्र. ४९ १५/६/२०२३ – वि.ग.सातपुते.(भावकवी) […]

परिपूर्ण स्त्री

आयुष्याच्या वाटेवर अचानक एक दगड आला ठेच लागूनी पायाला देह तिचा कोसळून पडला ज्यावर होता विश्वास खूप तोच टाळून निघून गेला अश्रू आले अलगद गाली पापण्यांतून सडा गेला आजवर त्यांनी जे काही होतं जपलेलं सारं क्षणात होतं तिथे पसरलेलं प्रेमळ त्या संसाराचा पाया पार खचून गेला आनंदाचा प्रत्येक क्षण हळूच हात सोडून गेला हलकेच मग दूरवर […]

चल ये पटकन….

चल ये पटकन खूप घट्ट मिठी मार,अरे बघ थोडी अजून जागा शिल्लक आहे, मिटवायचं आहे ना हे पण अंतर मग सांगते तसं कर ना, घट्ट घट्ट अजून घट्ट मिठी मार! बघ तू मी जे सांगते ते ऐकतच नाहीयेस, एका जागेवरून कणभर हलत सुद्धा नाहीयेस! नुसतं एक टक बघत राहतोयस माझ्याकडे, लुक्स काय देतो ? असं विचारल्यावर […]

वांझोटी

रिता माझा पाळणा अन रीती माझी झोळी गं! रीती माझी ओटी अन नशिबाची खोटी गं! कुणा सांगू यातना, कुणा देवू दोष रं? रित्या माझ्या काळजाला, कुणाची ओढ रं? वांझ माझी ओटी त्यात माझा काय दोष रं? आई माझ्या आत्म्यातील तिला नाही झोप रं! पान्हा देऊ कुणा अन् कुणा देवू ऊब रं? आईपणाची झाली खोटी, ममतेची दोरी […]

‘तीची गगनभरारी

विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री अबला नाही तर दुर्गा असलेली स्त्री शरीराने असली नाजूक तरी रोजची कसरत करते ती मनाने असली हळवी तरी खंबीर असते ती माहेर, सासर जन्मापासून सगळी नाती सांभाळत असते स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्यभर जगत असते स्त्री म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याची खाण असते चार भिंतीना घरपण देऊन घराचे पावित्र्य राखत असते. स्त्रीवर अत्याचार […]

1 8 9 10 11 12 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..