नवीन लेखन...

जगरहाटी

आता शब्दमनभावनांना आवरावे टाळावीत मुक्त, मोकळी वक्तव्ये…. दुखावतात मने सहज बोलताना नित्य शब्दमनभावनांना सावरावे…. कुणी कसेही बेमुर्वत इथे वागावे आपण फक्त मौन गिळूनी रहावे…. प्रेम जिव्हाळ्याची नाती रुक्ष आता सहृदयी भावनाच संपली समजावे…. मानमर्यादा, ज्येष्ठत्वही इथे संपले बोलणाऱ्याने आता हवे ते बोलावे…. हीच कलियुगाची सत्य जगरहाटी आपणच समजून उमजून चालावे…. रचना क्र. 13 5/5/2023 -वि ग.सातपुते […]

गरज

शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे. संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे. कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत परतून येणे हे खूप गरजेचे आहे. लांबी मोजून काय करायचंय ह्या जीवनाची? दुःखाचे दिवस वेगाने व सुखाचे दिवस हळू हळू जावेत हे खूप गरजेचे आहे. शेवटी राखेत मिसळून जाणार ही जाणीव असतानाही धावत […]

गजल की कविता

गजल आहे की कविता आहे गुंफलेल्या शब्दांची माळ आहे !! राग आहे की ताल आहे सूर शब्दांची धमाल आहे !! देव आहे की भक्त आहे आरोळीतला मृदंग टाळ आहे !! मी आहे की तू आहे डोक्यावर ठेवलेली झाल आहे !! आवाज आहे की सुर आहे एक गळ्यातला स्वर आहे !! रक्ताची आहे की भावनांची आहे जी […]

हा मंच खास

नमन असे हे माझे तुला आभार असो या विश्वाला तू असे गुणांची खाण तुला वर्णाया शब्दांची वाण तुझे कर्म जणू कर्तव्य तू जणू विश्वाची ठेव तू मायेचा आधार तू जणू भविष्याचे द्वार हरविलेल्या तुझ्यातल्या ‘मी’ साठी केला हा एक उपहास आनंद, उत्साह, सोहळा तुला तुझेपण जगाया व्यास क्रिएशन्स्ने केला हा मंच खास – अस्मिता निंबर्गी व्यास […]

प्रश्न !!

माझ्या मते वाया गेले आयुष्य माझे तुझ्या मते शुल्लक होते प्रश्न सारे !! बोलण्यासाठी शब्द कुठे शिल्लक होते ? शब्दांसाठी शब्द हे, शब्दांचे खेळ सारे !! नको विचारू उत्तर, जीवघेण्या प्रश्नांचे प्रश्नांने उपजती प्रश्न, राहूदे ते प्रश्न सारे !! जगण्याचा बहाणा तुझा की माझा खरा आज माझी परीक्षा तूच ओळखून घे सारे !! कुठे नेऊ कसे […]

मी कोण आहे

मी कोण आहे मी एक स्त्री आहे आई-बाबांच्या लाडात वाढलेली थोडीशी खोडकर थोडीशी हट्टी मी एक मुलगी आहे मी एक स्त्री आहे मातापित्यांच्या सावलीत वाढलेली चांगले संस्कार घडलेली थोडीशी अल्लड, थोडीशी बालिश मी एक कळी आहे मी एक स्त्री आहे त्याची ती आहे होय प्रेयसी आहे स्वप्नात वावरणारे मी एक परी आहे मी एक स्त्री आहे […]

सुखामागे धावताना

सुखामागे धावताना माणूसच हरवला आहे आयुष्य जगताना आपली नाती विसरला आहे भविष्याची तयारी करताना मनातील भाव हरवला आहे – गायत्री डोंगरे व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

मैत्री

मैत्री असते आंबट गोड हृदयाला हृदयाची जोड मैत्री असते मायेची पाखर तुझ्या सुखाला माझ्या आनंदाची झालर मैत्री असते राधाकृष्णाची बासरीच्या सुरात विरघळण्याची मैत्री असते जिवाभावाची मनातले गुपित हळूच ओळखण्याची मैत्री असते हळवे पणाची माझे अश्रु तिने पुसण्याची मैत्री म्हणजे सतारीची तार माझ्या वेदनेचे तुझ्या काळजात झंकार मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा रणरणत्या उन्हात बर्फाचा गोळा -स्वप्ना साठे […]

आठवणींच्या विश्वात

वाळूत ओढत रेघा, मी बसले होते आठवणींच्या विश्वात मी रमले होते. कुठून तरी चाहुल मला लागली दुसरे नव्हते कुणी माझेच मन होते कधी मी मनाला कधी मन मला अनेक आठवणींचे झरे वहात होते आठवणीच्या झऱ्यांनी शब्द मूक झाले बोलण्याचे काम मग अश्रूंनीच केले. – कु. निलांबरी शां. पत्की व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

स्त्री

स्त्री आहे अंबा,दुर्गा आणि काली, अष्टभुजा धारण करणारी रणरागिणी. सांभाळ करून सर्व नात्यांचा प्रेमाने, गाजवते अधिराज्य जगात शक्तीने आणि युक्तीने. बाबांच्या ह्या इवल्याश्या परीने, फुलविला तिचा संसार स्वकर्तृत्वाने. मिळाली देणगी मातृत्वाची हिच्या उदरी, संयमाने करते ती पालनपोषण दिवस-रात्री. शिकवतेस जगाला प्रेम, आपुलकी आणि माया, नाही पडू देत संसारावर कधी दुःखाची छाया . सांभाळताना तुझ्या संसाराचा गाडा, […]

1 9 10 11 12 13 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..