अतृप्ती
रिमझिमत्या पावसात माझ्या गर्द केसात मोगरा माळताना तू दाखवलीस स्वप्नं… रुणझुणत्या चुड्याची भरजरी शालूच्या स्पर्शाची पराक्रमी राजपुत्रानं नजर करावं गुलबकावलीचं फूल हळव्या राजकन्येला तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली तुझी शपथ, तेव्हा वाटलं पायतळी मंझिल आली ! आणि मग – हातीच्या गुलाबाची पाकळी पाकळी पडावी गळून.. तसे क्षण गेले निसटून नि कसली अगम्य ओढ मनात राहिली दाटून? […]