नवीन लेखन...

काळं अधिवेशन

क्षुल्लक विषयावरचं सेशन -बराच वेळ रंगवलं होतं दोघांनी.मी ही मग घरात आलो -घोषणा मात्र ऐकू येत होत्या -एकाच साच्यातल्या,बहुधा काकंत्रालयाच्या बाहेर -पायऱ्यांवर बसून दिल्या जात असाव्या.आवेश तोरा अन् दिखाऊपण मात्र -अगदी तस्संच होतं. […]

बापाचं मन

एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..! कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..! वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही काळोखात […]

ओझं

जड झाला जीव आता ओझं सोसवत नाही… भोग भोगायचे किती आता देवादारी बसवत नाही…! जन्म वाया गेला राबण्यात नाही गाव दुसरं पाहिलं.. भरल्या गोकूळ घराचं सपान मनात राहिलं..! वाट एकटा चालला तिला जोडीला घेतलं.. एक नातं विश्वासाचं त्याच्या जिवावर बेतलं…!! …. राजेश जगताप, मुंबई ९८२१४३५१२९.

चण्याची पुडी

माझे मन आहे चण्याची पुडी जड विचारांची तळाशी बुडी भरले आहेत चणे फुटाणे तेच चव साधती साधेपणे मावत नाही काजू अक्रोड कशास हवी ती डोकेफोड ? लांब ठेविले बदाम मनुके यास्तव मन हे हलके फुलके चणा वाटतो आपलाच सहज बाकी भासती किंमती ऐवज नको बेदाणे खारीक पिस्ते तेच घडविती विवाद नस्ते चघळत बसतो एक चणा मुरवत […]

तुझ्या-माझ्या कविता

माझ्या झेपावत्या पंखांना तूरेशिमपाश बांधलास नि त्यांनी वसा घेतला मायेचा — प्रेमाचा आता या पंखांखालून तू होऊ नकोस – रानभरी ! शस्त्रांचीच सवय होती या माझ्या हातांना ! तू पेटत्या हातात फुलं दिलीस, शस्त्रं आपोआप बोथटली नि फुलांची वरमाला कधी झाली कळलंच नाही ! मी निघाले होते स्वातंत्र्याचा पत्ता शोधीत निखाऱ्यांचा वसा घेऊन सोन्याच्या बेड्या तोडून […]

तुझ्यासाठी

कवितेच्या तलम पडद्याआडून माझ्या भावना तुला सागतात माझ्या विरहव्यथा शकुंतलेची व्यथा सांगावी दुष्यंताला तिच्या सखींनी तशी क्वचित दुर्लक्षिल्यासारखं क्वचित दाद देत तू म्हणतोस वा ।’ आणि निघून जातोन कसं सांगू तुला कवितेतून? माझ्या कविता तुझ्यासाठी असतात! –सौ. राजलक्ष्मी देशपांडे

माती

आज डोळे उघडताना रंगलेले दिसले सनईचे सूर पहाटेच्या क्षितीजावर… सातच पावलं चालून मी पोचले आभाळाकडे पण देहाचं नातं मातीशी अजून तुटलं नाही… तसं काहीच विसरले नाही, विसरता येणार नाही या मातीनंच माझे घुंगुरवाळे मळवलेत हळूवार खेळवलेत… माझ्या कणाकणात मिसळलेली ही माती.. आठवतंय – श्रावणातल्या धारांनी ही माती थरारताना माझा कणन्कण झेलायचा तिचा शहारा वसंतात ती यायची […]

नातं

काय होतं कुणास ठाऊक देवासंग नातं अनवाणी चालत कुत्रं वारीला गेलं होतं पाऊसपाण्यात जरी भिजलं होतं अंग विठ्ठलाच्या गजरात तरी झालं होतं दंगं…! चंद्रभागेच्या पाण्यात अंग ओलं केलं मनात घेऊन वेडा भाव पायरीशी गेलं दारामागच्या देवाला भेटणार तरी कसं माणसांपुढे बिचा-याचं झालं होतं हासं.! माणसाचा देव माणसांसाठी असतो ज्याच्या खिशात पैसा त्यालाच तो दिसतो पायरीवर बसून […]

फरक…

घरट्यातील पिल्लं तोंड वासून वाट बघतात. त्या हाका दूर वर असलेल्या पक्ष्यांना ऐकू येतात… पखांत बळ आणून वेगाने येतात उडत उडत. इवल्याशा चोंचीत एकेक दाणा राहतात घालत घालत.. मोठी होतात धडपडतात. पडतात उठतात. आणि पंखात बळ आले की दूर दूर उडत जातात.. घरटं होत ओकबोक. पण हे दोघे असतात आनंदात. पक्षाला वाटतो अभिमान. कालवाकालव होते मात्र […]

ब्रेकअप

काळजाचं पाणी झालं जेव्हा ती माझ्याशी बोलली मी तुझ्यावर प्रेम करते माझ्यावर तु करशील का ? सांग सख्या माझ्यासाठी सर्वस्व तुझे देशील का ? मी ही तीला हो म्हणालो आय लव्ह यू टू म्हणालो प्रेमाच्या आणाभाका घेत प्रेमाचा प्रवास सुरू झाला प्रेमाच्या वर्षावामध्ये देह चिंबं भिजू लागला दिवसामागुन दिवस गेले रात्रीमागुन रात्र गेली प्रेमाच्या नशेमध्ये दोन […]

1 13 14 15 16 17 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..