कोकणचा कुलाचार
कोकणाचा कुलाचार भावे पाळतो वरूण इथे निसर्ग भरतो अन्नपूर्णेचे बोडण सह्याद्रिचे कातळकडे जणू मांडिले चौरंग हिरवट रानवेली, रांगोळीत पुष्परंग शेते-खाचरे रेखीव मांडलेल्या काथवटी त्यात केळीची ग पाने हिरवळीची गोमटी ताडामाडांसह उभे स्वागता आगर सुवासिनींचे चरण धुतो अरबी सागर सुरंगी-अबोलीचे देवीलागी वळेसर आंबे फणस जांभळे नैवेद्याला फलाहार अष्टगंधाचा दरवळ देती बनात केवडे देवीच्या पूजेला नारळ-सुपारी अन् विडे […]