नवीन लेखन...

विश्वरूप

कोमल वेलिवर कळीने उमलावे फुलुनी फुलावे गंधुनी गंधाळावे… प्रसन्न चराचरी मनमन दरवळावे नेत्री विठ्ठलविठ्ठलु भक्तितुनी पाझरावे… परब्रह्म ते सावळे गाभारी प्रकट व्हावे कृतार्थ आत्मरूप विठ्ठल चरणी रमावे… विश्वरूप ते गोजीरे टाळमृदंगात भजावे दिंडीपताका वैष्णवी शिरी धरूनी नाचावे… ****** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०० २१/११/२०२२

तुझा बाबा

झोपेतून उठताच बाबा बाबा करी हाती माझ्या आहे तुझ्या पाळण्याची दोरी रडू नको बाळा तुला देतो मी झुला आभाळाच्या उंची वरी नेतो मी तुला तेथूनच बाबा ला तू न्याहाळत रहा हाता मध्ये आहे त्याच्या खेळणी पहा…. ना ना ना ना ना ना…. ना ना ना ना ना ना…. उगी उगी बाळा आता थांब ना तू जरा […]

गृहीणी

ती च्या भोवती त्या चं अस्तित्व असतं अनेक नात्यांना गुंफत घर तीचं सावरतं असतं म्हणुनच ती चं नाव गृहीणी असं असतं सारं कुटुंब त्यांच्याच कायम ऋणात असंतं ज्यांचं नाव गृहीणी असतं त्यांच्या अंगी वास्तल्य वसतं गृहीणी आहे म्हणुनच कायम घराला घरपण असतं त्यांच्या अस्तित्वामुळेच वसुधैव कुटुंम्बकम् असतं — उमेश तोडकर

शल्य

आता सारेच नावापुरते आस्था आपुलकी नाही हास्य केवळ तोंड देखले मनस्वी खरा आनंद नाही ” या, या, कसे आहात ? बरेच दिवसात गाठ नाही सारे काही ठीक आहे नां ? शब्दात या कुठे प्रेम नाही सारेच आता भावशून्य ओढ अंतरी उरली नाही भावनांचीच पायमल्ली नाती तशी उरली नाही दिवस येतो आणि जातो आपले कुणी वाटत नाही […]

अस्तित्व

खरं तर प्रत्येकाच एक विशिष्ठ अस्तित्व असतं आत्मसन्मान जपताना जीवनच पणाला लागतं जगतानाही खरं तर कुणीच कुणाचच नसतं सारी नाती व्यवहारिक हे सर्वत्र जाणवतं असतं सोबती सुखाचे असतात दुःखात तसं कुणी नसतं प्रत्येकाचे संचित वेगळे प्रारब्ध भोगायच असतं मन संवेदना सारख्याच सारं काही सोसणं असतं काही किती जरी लपवलं सत्य ! समोर येतच असतं ******** — […]

चैतन्य

**** बरस बरसला घन रिमझिमल्या धारा चंद्र नभीचा भिजला सुस्नात झाली वसुंधरा धुंद सुगंध मृदगंधला सभोवती दरवळणारा श्वासात श्रावण श्रावण पवन तो झुळझुळणारा जीवास चाहुल तृप्तिची सुखावितो विंझणवारा सृष्टित साक्ष चैतन्याची साक्षात स्वर्ग भुलविणारा ******* — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २९७ १९/११/२०२२

समानतेच्या वाफा

भांडी घासताना विम बार धुणं धुताना व्हील तिच्याच हातात दाखवतात आणि तरीही ती किती सुंदर हसते जाहिरीतीत… बादशहा मसाल्याची फोडणीसुद्धा तिच देत असते आणि सासऱ्याच्या गुडघ्याला मुव तिच लावत असते आणि तरीही ती किती सुंदर हसते जाहिरातीत… बाळाचं डायपर तिच बदलते आणि मुलांना एका मिनिटात मॅगीही तिच बनवून देते आणि तरीही ती किती सुंदर हसते जाहिरातीत… […]

भगवंत

आले भरून आभाळ झाकोळले आसमंत सांज सांजाळ केशरी वृदांवनी तेवते ज्योत ओढ़ गुंतल्या जीवास आत्म रंगले पावरित झंकारली मंत्रमुग्ध धुन चाहुल हरिची अंतरात तनमन सर्वार्थी मुक्त रमले भक्तीच्या रंगात लोचनी सत्याची जाण सर्वांतरी एक भगवंत –वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) रचना क्र. २९६ १८/११/२०२२

आत्मसुख

सखे सुखवित सुखा शांत निजली यामिनी नको जागवुस आता पुनःपुन्हा स्पंदनांना गंगौघी अमृतात विरघळली अधरे तृप्तवुनी अंतरीच्या साऱ्याच संवेदनांना निष्पाप, निरागस अवीट आत्मसुखदा अव्यक्त शब्दभावनांना व्यक्त कसे करु सांगना झाला श्रावण पावन, मंत्रमुग्धली पावरी राधामीरा आळविती गीतात भक्तीभावनांना –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २९४ १६/११/२०२२

नाती मृगजळी

वात्सल्य, प्रीत, लळा, जिव्हाळा या भावनांचे आज अर्थ बदललेले उरि न उरली माया ममता ममत्व ओढ, आस्था आपलेपण विरलेले निर्जीवी, पोकळ ते भावबंध सारे नातेच रक्ताचे, मृगजळी तरंगलेले इथे कुणीच कुणाचे कधीच नसती सत्य विदारक जगी पचनी पडलेले स्वसुखात जगणे उलघाल स्पंदनी स्वास्थ्य सारे मनामनांचे हरविलेले कलियुगाची रिती, स्वार्थी विकारी नात्यातील, प्रेमच सर्वत्र मालवलेले — वि.ग.सातपुते […]

1 19 20 21 22 23 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..