नवीन लेखन...

येरे मना, येरे मना

येरे मना, येरे मना नको जावू दूर, दूर, दूर येथे नाही रे आता जीवाला हुर, हुर, हुर…..।।धृ।। सोडूनी दे रे, ते तुझे नवे, नवे बहाणे सोडूनी दे रे ते तुझे आज इथे अन उद्या तिथे झुळझुळणाऱ्या वारुसंगे नकोस उधळू दूर, दूर, दूर….।।१।। चल पाहू या रे विवेकी सुंदर गांव चल घेवूया या रे शांती सुखाचा श्वास […]

निष्काम निर्लेपी

कोण छोटा कोण मोठा सहॄदयी तो आत्मा मोठा जिथे सुखावे तन्मनअंतर तो निष्काम निर्लेपी मोठा ब्रह्मांडालाही कवेत घेतो तो निर्गुण निरागस मोठा प्रसन्न कृपाळू रूप ज्याचे तो अगम्य परमात्मा मोठा जो भेटता सुख मोक्षानंदी तो अनामिक ईश्वर मोठा कर्मकांडी सत्कर्मी जगावे तोच एक संचिताचा साठा हरिनामी नित्य रमुनी जावे मोक्षमुक्तिचा तो मार्ग मोठा — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

कृतज्ञता

आज मागे वळून पाहताना मला उमगतेय की मला माझं अस्तित्व नाही… किंबहुना नव्हतेच कधीही कारण मी अंश आहे- तुमचाच वंश आहे तुमचाच मी भाग आहे- थोडा आईचा थोडा माझ्या पप्पांचा मग इतक्या उशिरा का या जाणीवांची जाण यावी अर्ध आयुष्य उलटल्यावर- स्पंदने का तीव्र व्हावी शक्तींच्या माझ्या उगम तुम्ही नि स्त्रोतही माझ्या न्यूनत्वाला निर्मीती तुमचीच मी; […]

अगम्य

अगाध लीला अनामिकाची अतर्क्य अगम्य ब्रह्मांड सारे सुख दुःखांची उन , सावली जीवनी प्रारब्धाचे भोग सारे…. शिशुशैशवी जीणे निरागस प्रगल्भ मनी , हव्यास सारे स्वार्थी मनीषा , सारेच माझे मृगजळा पाठी धावती सारे…. भावभावनांचे शुष्क कंगोरे इथे प्रीतभाव सुकलेले सारे मनामनात मौन साशंकतेचे संपले विश्वासाचे नाते सारे…. कधीकधी वाटते सुर जुळले क्षणार्धात हरवूनी जाते सारे जरी […]

प्राची, पश्चिमा

सुंदर प्राची, सुंदर पश्चिमा लालकेशरी उधळण सुंदर… चराचराचे हे रूप अनोखे संवेदनांची ती झालर सुंदर… जीवन केवळ प्रवास इथला प्रारब्धाची अटळ रेखा सुंदर… सारीपाटाचेच फासे जीवनी सारे, भगवंताच्या हाती दोर… सुखदुःखांची साऊली भाळी तिला झेलित, जगावे निरंतर… आज मला हेच कळून चुकले सत्यवास्तव जीवनाचे चिरंतर… — वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) रचना क्र.२७६ २९/१०/२०२२

गंध कस्तूरी

सखये अजुनही दरवळवतो तुझ्या, प्रीतीचा गंध कस्तूरी…. रुतलेल्या तुझ्या पाऊलखुणा मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी…. आजही तुझेच वेड लोचनांना उमलुनी येती प्रीतभाव अंतरी…. सांगनां, यातुनी सावरावे कसे मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी…. हे गुज, मनीचे मधुरम प्रीतीचे व्याकुळलेले, केशरी सांजतीरी… कालचक्र हे अखंडित अविरत तशीच ओढ़, तुझीच गं निरंतरी…. –वि.ग.सातपुते (भावकवी)  (9766544908 ) रचना क्र.२७५ २९/१०/२०२२

स्वप्नात माझ्या येशील का?

आज रात्री पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या येशील का? पुन्हा एकदा तशीच मला आर्त साद घालशील का? जीवनाचा एक डाव माझ्या संगे मांडशील ना! अमोलिक आसवांना माझ्यासंगे देशील का? तुझ्या माझ्या बंधनांना भावनांत गुंफशील का? सांग माझ्या वेदनांना तू दिशा देशील का? काळजाची स्पंदने माझ्या तू होशील का? चांदण्यात वेचलेली फुले तू नेशील का? माझ्यासाठी आसवांना वाट […]

विचार

आपलंच मन , आपलेच “विचार” , पण त्याचेही असतात अनेक प्रकार …. आजूबाजूच्या गोष्टींसारखे … वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !! काही विचार “पिंपळपाना” सारखे .. मनाच्या पुस्तकात वर्षानुवर्षे जपून ठेवत ; त्याची जाळी करण्यात मजा असते !! काही विचार “फुलपाखरा” सारखे .. वेळीच कोषातून बाहेर काढत ; मुक्तपणे व्यक्त करण्यात […]

आठव

शांत व्हावे, आठवांचे मोहोळ साठव जागवित काळीज थकले जगायचे ते सारे जगुनी झाले भोगण्यासारखे काही न उरले स्मरणी दिव्यत्वाचे स्पर्श ममत्वी ते भाग्य कृपाळू जगवित राहिले ऋतुऋतु भारले दृष्टांत निसर्गी स्थित्यंतरे सृष्टित घडवित राहिले भौतिक सुखाला, विटुनी जाता ध्यास परमार्थाचे जीवास लागले अंतर्मुख झालो जेंव्हा हॄदयांतरी सत्यार्थ जीवनाचे उलगडुनी गेले –वि.ग.सातपुते. (भावकवी) (9766544908) रचना क्र. २७४ […]

अनुसंधान

इथे केवळ मीच शहाणा मलाच सारेकाही कळते दंभ नसावा अहंपणाचा गर्वाचे घर खाली असते….. कोण आकाशांतुन पडतो जन्म एक प्रसवणे असते एकची न्याय दयाघनाचा जन्मुनी अंती जाणे असते….. दिल्याघेतल्याचे नाते इथले पूर्वकर्मी ऋणमोचन असते सत्कर्मी अनुसंधान साधावे तीच एक मोक्षमुक्ती असते….. वि.ग.सातपुते.( भावकवी ) (9766544908) रचना क्र.२७३ २७/१०/ २०२२

1 22 23 24 25 26 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..