नवीन लेखन...

एकतेची शपथ

चला बंधूहो एक होऊ या शपथ तुम्हाला शिवरायाची आज देऊ या, खंबीर शाश्वती, समर्थ भावी भारताची ॥ धृ ॥ प्रणाम असू द्या त्या शिवबाला प्रणाम हा लोकमान्यांना प्रणाम असू द्या वीरांना माझा, निष्ठांना नि मूल्यांना ॥ हिमालयासम पावित्र्याला नि शांतिच्या येथील पूजेला प्राणांहूनही प्रिय अशा या विशाल माझ्या देशाला ॥ १ ॥ हा हिंदूचा देश मुलांनो […]

काव्या

कवितेनेच मला जगविले नकळे कुठुनी कानी आली मधुरम, मंजुळ हरिपावरी मुग्ध कविता उमलु लागली… प्रारब्धाचे जरी भोग भाळी काव्या ही सावरित राहिली ओंजळीतली भावशब्दफुले अर्थ जीवनाचा सांगु लागली… अंतरीची निर्मळ शब्दभावनां गीतातुनी, झुळझुळू लागली शब्दपाकळ्यात भुलुनी जाता कविता मज जगवित राहिली… त्या कवितेला न तमा कुणाची सत्याविष्कारी ती दंगुनी गेली स्वानुभूतीच्या हृद्य संवेदनांना शब्दाशब्दातुनी गुंफित राहिली… […]

अनामिक

सर्वांतरी, तो एक अनामिक चराचर सारे रूप भगवंताचे प्रेमवात्सल्ये जगतो जीवात्मा आत्म्यात रूप त्या भगवंताचे कळणार कधी, तुला मानवा हा जन्मची रे दान दयाघनाचे तोची वसतो जीवाजीवातुनी जाण रे, सत्यरूप भगवंताचे कोण म्हणूनी? कां रे संभ्रम ब्रह्मांडाचे, रूपही दयाघनाचे त्याच्या ठायी नतमस्तक व्हावे रांजण, भरित रहावे सुकृताचे वि.ग.सातपुते.( भावकवी) (9766544908) रचना क्र.२७१ २५/१०/२०२२

माझं मागासलेपण

प्रस्थापितांनो मी तुमच्या विरुद्ध आहे मला माहीत आहे, साहेबाला न पटणाऱ्या त्या अंधश्रद्धा बनतात साहेबाला रुचणाऱ्याच गोष्टी विज्ञाननिष्ठ असतात कदाचित साहेबाचे बूटही विज्ञाननिष्ठ असावेत कारण ते चाटण्यात प्रस्थापितांचा पुढारलेपणा असतो म्हणूनच मी अंधश्रद्धाळू आहे कारण साहेबाची लाचारी मला जमत नाही ‘पिंजऱ्यातील’ पुढारलेपण मला भावत नाही मी मागासलेला आहे, कारण- माझ्या पूर्वजांचा मला यथायोग्य अभिमान आहे माझ्या […]

दीपोत्सव

आली मांगल्याची दीपदिवाळी सुखसौख्याला सजवित आली उत्सवांचा राजा, सण दिवाळी दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली… स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला जणु वसुंधराच तारांगण जाहली दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत अमंगळ सारित मांगल्या आली… सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी अंगणी संस्कारांची सडारांगोळी तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली… वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली चैतन्या! सजवित मढ़वित आली… वि.ग.सातपुते.( भावकवी ) ( […]

पाझर

वाटते सारे विसरुनी जावे परी आठव व्याकुळ करते… श्वासात रुतलीस तूं अशी तुज उसविणे जीवघेणे असते… रुधिरातील तुझीच सळसळ लोचनातुनी अविरत पाझरते… सांग कसे, तुज भुलुनी जावू स्मरण तुझेच जगवित असते… विस्मरणे कां असे इतुके सोपे अंती सरणीही ते सोबत असते वि.ग.सातपुते.( भावकवी ) (976654908 ) रचना क्र. २६९ २३/१०/ २०२२

II समर्थांची प्रार्थना II

समर्थ रामदासा , प्रेरणेच्या स्रोता – तुला दंडवत ! मला शक्ती दे, सामर्थ्य दे ! मानवजातीवर तुझा कृपाप्रसाद अविरत असू दे ! हे गुरु समर्था, मला तुझ्या समीप ठेव ! उत्तम पुरुषांचे गुण आत्मसात करू दे ! सत्याच्या पथावर प्रकाश दाखव ! माझ्या अंतर्मनातील दिव्यत्व उजळू दे ! हे थोर समर्था, मला आणी सर्वांना मार्गदर्शन कर- […]

पोकळ दिखावा

सारा असतो फक्त दिखावा मृगजळा सारखी सारी नाती कुणीच नसते, कधी कुणाचे इथे स्वार्थापोटी जुळती नाती दिल्याघेतल्याचे हे जग सारे त्याविण कां? कुणी सांगाती भाव लोचनी भोळे, भाबडे भरोसी, जीव जातो गुंतुनी गळाभेटी, दिखावा पोकळ पण हे सारेच कळते सर्वांती विकलांग होती श्वास जेंव्हा जीव कासवीस होतो एकांती –वि.ग.सातपुते( भावकवी ) 9766544908 रचना क्र.२६८ २२/१०/२०२२

माझा भारत

दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो वेड्यासारखा मी पुटपुटतो माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥ तुझ्यावर जगणारी पाहून टोपीखालची बांडगूळं मी उगा विव्हळतो माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥ तुझ्या वेदनेची कळ माझ्या काळजात उठते माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥ तूच माझा जिव्हाळ्याचा एकमेव अर्थ जगण्याचा सत्ताधांना […]

सत्कर्म फ़ळा यावे

गतजन्मांचे, सत्कर्म फळाला यावे जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे… सकल शक्तीचे, घेवुनी दान विवेकी नरदेही, हरिहराने वाजतगाजत यावे… असुरी, प्रवृत्तिंच्या निर्दालनासाठी सर्वेश्वराने, आता ब्रह्मांडा सावरावे… रामराज्याची सुखस्वप्ने जगण्यासाठी प्रभुरामाने, पुन्हा जगती जन्मा यावे… आत्मरंगी तृप्तलेल्या आत्मारामा मोक्षामृत, पाजीत नारायणाने यावे… गतजन्मांचे ते सत्कर्म फळाला यावे जन्मुनी जगती मानव जन्मी जन्मावे… –वि.ग.सातपुते( भावकवी) 9766544908 रचना क्र. २६७ […]

1 23 24 25 26 27 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..