वैफल्य
निरर्थक शब्दांची दाटी, का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही सजवलेली शय्या, ताटी का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥ मनातले उमटत नाही कुणास ठाऊक का म्हणून सुटा पसारा जुळतच नाही कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥ वेड्यागत हव्यास का हा सामान्यतेहून दूर जाण्याचा धडपडूनही जेव्हा फसतो प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥ […]