नवीन लेखन...

मजुराचे मनोगत

मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन । कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥ जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा। येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥ यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते। कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥ करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन । […]

तिरंगा

केशरी, श्वेत, हरित ध्वज समृद्धी तिरंगा सौखसुखदा भारताची मांगल्य ध्वज तिरंगा…. अस्मिता भारतीयांची ध्वज अभिमानी तिरंगा शौर्यशक्ती, बलिदानाचे सत्य रूपक हा तिरंगा….. ही जन्मभूमी देवतांची साक्ष संस्कृतीची तिरंगा श्वासाश्वासात देशभक्ती रुजवीतो हाच तिरंगा…. जगतवंद्य जगतवंद्य शांतीदूत राष्ट्रध्वज तिरंगा वंदे मातरम, वंदे मातरम मुक्त फड़कवुया तिरंगा…. –वि.ग.सातपुते .(भावकवी) 9766544908 रचना क्र.१९७ १३/८/ २०२२

जीवन

विसरुनिया अस्तित्वाला निसर्गात एकरूप व्हावे क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा एकांती आत्ममुख व्हावे…. शमता अशांत कोलाहल हळूच मागे वळूनी पहावे शिशुशैवव, पौगंड यौवन पुन:, पुनः,पुनः आठवावे…. वास्तव, हे भाग्य भाळीचे ते, वात्सल्यप्रेम आठवावे व्याकुळ उर, भरूनी येता मौनी अश्रुंना प्राशित रहावे…. जे लाभले ते दान प्राक्तनी अंतर्मुख ! सदा होत रहावे सुख,दुःख, संवेदनां, चिंता रेतीवरच्याच, रेषा समजावे…. वास्तवता […]

सुटका

राबली होती ती – आयुष्यभर, आईबापाघरी आणि – नंतर सासरीही . जणू आयुष्यच तिचं – आजवर, नव्हतं स्वतःसाठी – जराही. आठवत नव्हतं – किंचितही तिला, कधी केल्याची कुणी – विचारपूस. “दे ग थोडा आरामही – जीवाला,” “मरमरून नको त्याला – जाळूस.” जीवनात नव्हती कधी – कसलीच हौसमौज, भावनाहिन शरीर मात्र – लागायचं रोजच्या रोज. कुरतडत ठसठसत, […]

खुर्ची

खुर्चीसाठी पोकळ बाता खुर्ची राजकीय ‘खल ‘बत्ता खुर्ची आहे माझी माता खुर्चीच सर्वस्व आता ॥ १ ॥ खुर्ची आहे तिखट मिरची आली जवळ तरीही दूरची खुर्चीसाठीच प्रवास माझा खुर्ची सोय माझ्या पोटाची ॥ २ ॥ खुर्चीसाठी हो पुण्याई गाठी खुर्ची माझी मी खुर्चीसाठी जरी प्रवेशली माझी साठी खुर्ची स्पर्धेत मी ना पाठी ॥ ३ ॥ दिल्यात […]

सत्य दृष्टांत

सत्य, दृष्टांत हरिहराचा शब्द निःशब्द भावनांचे लोचनीच फक्त साठवावे रूप, अतर्क्य नियंत्याचे….. गवाक्षी कवडसे नारायणी तिमिरीही भाव प्रसन्नतेचे उघड़ता कवाड़े अंत:चक्षु ओंजळी शब्द सरस्वतीचे द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे…. मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे अर्थ ! उमजावे सात्विकतेचे निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे स्मरावे नित्य नाम भगवंताचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) […]

मन श्रावण

सखये सृष्टिलाही स्वप्न तुझे ऋतुं ऋतुंतूनी तूं झुळ झुळते…. ऋतुं रंगली, तुं स्वरूप सुंदरी चैतन्याला मनमुक्त उधळीते…. कुसुम सुमनी, तुझेच दरवळ कांचन किरणातुनी तू स्पर्शते…. तव अधरीचे, हास्य श्रावणी मन मनांतर, मोहरुनी जाते…. तूच अंतरी सप्तरंगले इंद्रधनु आत्म सुखाची प्रचिती असते… तूच श्रावणातील श्रावणधारा अव्यक्तालाही चिंब भिजविते…. क्षण हेच खरे अवीट ब्रह्मानंदी निर्झरी, संथ गुणगुण तोषविते…. […]

फुला रे

मिटून-मिटुन पाकळी, फुला रे, आता तरी पड खाली तो बघ तिकडे सूर्य मावळे तुझेही तसेच केसर पिंकले कर जागा मोकळी, फुला रे, मिटुन पड खाली ॥ सकाळची रुसली उषा गाढवा बघ आली निशा चढली रात्रीलाही काजळी, फुला रे, मीट आता पाकळी ॥ सुगंध तुझा पसरलेला जाण, हा पुरा ओसरला का तरीही जागा व्यापली फुला रे आता […]

कृतकृत्य

निसर्ग भगवंताचे रूप स्पर्श दिव्य अनामिक लाभता या स्पंदनांना आत्मिक शांती सात्विक…. अविष्कार पंचभुतांचे सदा सर्वदा सौख्यदायक नक्षत्रे अलंकार सृष्टिचे लोचनी उमले नंदनवन…. क्षण सारेच भारावलेले स्वानुभूतिच आनंदघन दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ मनमनांतर पावन पावन…. सृजनता ही अलौकिक झुळझुळते तृप्त जीवन निर्मोही, भाव परस्पर निरंतर कृतकृत्य जीवन…. –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.१९२ ८/८/२०२२

चेहरा

चेहरा, बिलोरी आरसा अंतरीच्याच भावनांचा प्रतिबिंब मनसंवेदनांचे सत्य साक्षात्कार मनाचा ऋणानुबंध सारे वोखटे अंतरात स्वार्थ स्वत:चा हीच आजची जगरहाटी इथे नाही कुणी कुणाचा चेहरा हसरा इथे बेगडी सत्य एक आरसा मनाचा –वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९३ ८/८/२०२२

1 31 32 33 34 35 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..