कोरडे पाषाण
कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे वैराण वाळवंटातील भगभगीत वारे नात्यांचे आखीवरेखीव बंध काही आपुलकीचा आनंद गंध नाही हास्याच्या कृत्रिम कवायती या अंतरीचा त्यात उन्माद नाही भावनांना यांच्या ओल नाही जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही आटलेल्याच मनोनद्या साऱ्या पात्र कुणाचेच खोल नाही आपुलकीची ओसरतीही सर नाही भावनांना कुणाच्याही घर नाही अहिल्याच्या शिळांना तर आता कुणा श्रीरामाचा कर नाही काळजात […]