वर्षाऋतु
तो आल्हादी पाऊस ढगफुटीचा गडगडाट रिमझिम पाऊसधारा मृदगंघली पाऊलवाट ती नितळ ओथंबलेली चिंबचिंबलेली बरसात शिडकावा मृदुलस्पर्शी अलवार तृप्ततो मिठित ऋतु, बावरा बरसणारा गगन, धरेस बिलगणारे मनामनांत पाऊस ओला निर्झर प्रीतीचे झरझरणारे रूप, मनोहारी चराचराचे चैतन्यांगण ते लुभावणारे वर्षाऋतु हा राजा ऋतुंचा क्षणक्षण मना रिझविणारे — वि. ग. सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १६८ १७ – ७ […]