सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत…. ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर […]
जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती […]
स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती. […]
मी 80 च्या दशकामध्ये बँकेची परीक्षा दिली. 78 साली कला शाखेची पदवी उत्तीर्ण झालो आणि लगेचच दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेची परीक्षा द्यायचं ठरवलं. तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीपुढे जे करिअरचे थोडेसे पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी एकतर डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा एखादी सरकारी नोकरी! तशी माझी शिक्षणातील गती ही एव्हरेज असल्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी बँकेची परीक्षा देताना मुंबई केंद्र न निवडता लांबचं नाशिक केंद्र निवडलं. […]
लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!! १८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी […]
हे पोस्टकार्ड पाहिलं की एकदम आजीची आठवण येते. ती खूप वाचायची पण लिहित मात्र नव्हती…का ते माहित नाही..पण पत्र लिहून देण्याचं काम आम्हा दोघी बहिणींचंअसायचं….पण ते आमच्याकडून कधीही अगदी सरळ नसायचं… […]
त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता. […]
वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती. […]
आमच्या बालपणी कधी आम्ही पिकनीकला गेलो नाही किंवा पर्यटनस्थळाला गेल्याचे फारसे आठवत नाही. अनेक जणांच्या तोंडून पर्यटनस्थळांची वेगवेगळी नावं मात्र ऐकली होती. मेळघाट्,लोणावळा, चिखलदरा,म्हैसमाळ ही नावं ऐकून त्याबद्दल खूप उत्सुकताही वाटायची पण, आमचे फेवरेट पर्यटन स्थळ म्हणजे गावचा हालोबाचा माळ. […]
युगानुयुगांपूर्वी (आता असंच म्हणायला हवं- १४ महिने चित्रपटगृहातील पडदा आणि नाटकाचा रंगमंच पाहिला नाही) पुण्याच्या बालगंधर्वला ” बाबला अँड हिज ऑर्केस्ट्रा “ला गेलो होतो दोन कारणांसाठी – ” कालीचरण ” ची टायटल ट्यून देणारा बाबला आणि “धर्मात्मा” साठी गायलेली कंचन या जोडीला ऐकण्यासाठी ! […]