नवीन लेखन...

आई-बाबा, आजी-आजोबांकडून ऐकलेल्या या जुन्या गोष्टींचा संग्रह !

नाव असे अजरामर होते

गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर असंख्य लोक या नव्या धर्माकडे आकर्षित झाले. हळूहळू गौतम बुद्धाचा शिष्यपरिवार वाढत गेला. प्रत्येक शिष्याला वाटे स्वतः गौतम बुद्धांनी आपल्याला काही तरी काम सांगावे. एका शिष्याला स्वतःच्या नावाचा फार अभिमान होता. ते लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी एकदा त्याला ‘तू तुझे नाव अजरामर कर’ अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे तो शिष्य स्वतःचे […]

सहृदयता हवी

थोर तत्त्वज्ञ कन्फ्युनिअस याची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे खास वैशिष्ट्य होते. त्याला बासरी वाजवायचा फार नाद होता. अनेकदा तो बासरी वाजवत एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असे. पैसा आणि संपत्तीपेक्षा त्याला मानवता जास्त प्रिय होती. त्यामुळे साहजिकच त्याच्याजवळ फारसा पैसा नव्हता. त्याची त्यालाही कधी खंत वाटली नाही. एकदा कन्फ्युनिअस असाच एके ठिकाणी बासरी वाजवत […]

नम्रतेची किंमत

अंगात नम्रता, विनयशीलता असली, की आपले कोणतेही काम सुकर होतेच. शिवाय आपलेही महत्त्व वाढते. नम्रतेची किंमत किती आणि कशी असते या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते… एक राजा एकदा त्याच्या प्रधानासह राजधानीचा फेरफटका मारायला निघाला. हा राजा खरोखरच अतिशय नम्र व प्रजाहितदक्ष होता. प्रजेची काळजी घेण्यात तो कोठेही स्वतःला कमीपणा मानत नसे. प्रधान आणि इतर मंत्रिजनांबरोबर […]

नदीपार

ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली. बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी […]

भिक्षापात्र 

“राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.  जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती. प्रसंगच तसा होता. त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली  भिक्षा मागण्यासाठी आला होता. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल. भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण, वचन […]

मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा………….!!!

“गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा” ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस […]

संन्याशी आणि उंदीर!

सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली. […]

सत्ता आणि संपत्तीपेक्षा समाधानच श्रेष्ठ

सत्ता आणि संपत्तीपेक्षा मनापासून केलेल्या कोणत्याही कार्यातील समाधान व आनंद सर्वश्रेष्ठ असतो. कारण लक्ष्मी ही चंचल असते असे म्हणतात. सत्तेच्या सहकार्याने मिळविलेली संपत्तीही अशीच असते. चीनचा तत्त्वज्ञ कन्फ्युशिअस हा असाच सत्तासंपत्तीपेक्षा सामान्य माणसाच्या समाधानात आनंद मानत असे. चीनच्या तत्कालीन सम्राटाने या ककशिअसला एका राज्याचा मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले. परंतु कन्फ्युशिअसला सत्ता आणि संपत्तीमध्ये कसलाही रस […]

गुणांचा शोध

माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते. अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी […]

मनाच्या स्वच्छतेची गरज

एक माणूस स्वच्छतेचा फारच भोक्ता होता. मात्र त्याचा अतिरेक एवढा वाढला की, या स्वच्छतेच्या नादापोटी त्याला सगळ्या गोष्टी अमंगळ वाटू लागल्या. घरामध्ये दैनंदिन कामे करताना जी अस्वच्छता व्हायची तिलाही तो कंटाळला व एके दिवशी स्वतःचेच घर सोडून तो दुसऱ्या गावी गेला. परंतु तेथेही त्याला जिकडेतिकडे घाण दिसू लागली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसला […]

1 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..