शाळेच्या व मित्रांबदद्लच्या आठवणी किती म्हणून सांगाव्या ..?अजूनही मागे शिल्लक राहतात.सारं आपलं बालपण हे शाळेभोवती गुंफलेलं असतं…शाळेत भेटलेले मित्र,त्यांच्याशी केलेली मैत्री सारं आठवतं…त्यामुळे आपल्यात आलेलं धाडस ,आल्या प्रसंगाला तोंड देणं यातून खूप काही शिकायला मिळतं.आपल्या चुकांमधून हळूहळू शिकत असतो आपण. […]
” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही. […]
कुणास ठाऊक कधी , कुठे व कसे : पण सगळे सीता निवास—राम निवास—लक्ष्मण निवास , प्रगति निवास , लक्ष्मी निवास , दत्त निवास वाले सगळे शेजारी ….. मला भेटतील , गेला बाजार हा माझा लेख वाचतील आणि माझ्यासारखीच त्यांनाही टिळक नगर आणि आसपास चा गणेशोत्सव आठवेल आणि हा वेडाविंद्रा उदय पण आठवेल ! […]
अशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार? […]
ही गोष्ट मी लहानपणी वाचली होती. रेळे गुरुजींच्या २४ पानी गोष्टीच्या पुस्तकात. अंधुकशी आठवत होती. तिचा शेवट मात्र लख्ख आठवत होता. हलकीशी आठवणारी गोष्ट थोडी फुलवून लिहिलीय. तात्पर्य मात्र तेच ठेवलंय. ही पोस्ट राजकीय नाही. कुणाला ती राजकीय वाटल्यास आणि या गोष्टीतून कुणी काही अर्थ काढलाच, तर ती जबाबदारी माझी नाही..!! […]
लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो . […]
माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]
कृषि विदयालयात मित्रांच्या खुप बढाया मारल्या जायच्या मी हे केलं मी ते केलं हे तर काहीच नाही त्यापेक्षा मी जास्ता करु शकतो वगैरेवगैरे. एकाने हरभराच्या झाडावर चढवायचे दुस-याने उतरवायचे अश्या बोलण्यातच एकदा आमच्या मित्रांमध्ये पैज लागली. […]