नवीन लेखन...

आई-बाबा, आजी-आजोबांकडून ऐकलेल्या या जुन्या गोष्टींचा संग्रह !

जीवनाचा मूलमंत्र

गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा […]

संत प्रीतमदास

सतराव्या शतकात गुजरातमधील अहमदाबादजवळील बावला या गावी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रीतम. तो मुलगा जन्मतःच अंध (सूरक्षस) होता. त्यातच त्याच्या लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे तो पोरका झाला आधीच अंध, त्यातून निराधार यामुळे प्रीतमचे लहानपणी खूप हाल झाले. भिक्षा मागून तो कसेबसे आपली उपजीविका करीत होता. एका कोणाबरोबर तरी प्रीतम भागवत पारायणाला  […]

शंकेचे निरसन

एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा […]

मनाची श्रीमंती

‘वचनं की दरिद्रता’ असे म्हणतात. माणूस कितीही गरीब वा दरिद्री असला तरी ही गरिबी वा दारिद्र्य प्रत्येक वेळी दाखवायलाच पाहिजे असे नाही. उलट कितीही दारिद्र्य असले तरी आपले बोलणे-चालणे, तसेच आचरणातून ‘ श्रीमंती’ दाखविता येते. त्याचीच ही कथा. एका चाळीतील एका खोलीत एक महिला व तिची चार लहान मुले राहात होती. त्यांची परिस्थिती फारच गरिबीची होती; […]

शेतातील धन

एक शेतकरी होता. तो फारच गरीब परंतु मनाने फार सज्जन होता. दररोज शेतीत राबणे व काम करताना हरिनाम घेणे हेच त्याने आपले मुख्य काम मानले होते.  त्याला तशी फार मोठी शेती नव्हती परंतु शेतीचे उत्पन्न जेवढे येईल त्यात तो समाधानी होता. त्याला एकूण चार मुले होती. परंतु ती सर्वच कामचुकार व आळशी होती. त्याची शेतकर्‍याला चिंता होती. एके […]

धन लोभी राजा आणि साधू

अवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत […]

सेनापतीची हुशारी

एका राजाच्या कोषागार विभागात दोन सेवक होते. एकाचे नाव होते धनीराम, तर दुसऱ्याचे मस्तीराम. मस्तीराम नावाप्रमाणेच मस्तवाल होता. कोषागार विभागात काम करताना अनेकदा राजाच्या खजिन्याचे दर्शन त्याला घडे. त्यामुळे त्याचा खजिन्यावर डोळा होता. खजिन्याचा किती दिवस नुसता पहाराच करायचा? संधी मिळाली तर खजिन्यातील मौल्यवान वस्तू चोरून दूर कोठेतरी पळून जाण्याचा व आरामात राहण्याचा त्याचा विचार होता. […]

संपत्तीचा मोह

प्राचीन काळची ही कथा आहे. एका नगरात रामरतन नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहात होता. व्यापारधंद्यात त्याने इतकी संपत्ती मिळवली होती की, त्या नगरीच्या राज्याच्या खजिन्यातदेखील इतकी संपत्ती नसावी. एकदा रामरतनला वाटले की, राजाला आपली संपत्ती दाखवावी व त्याची मर्जी प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याने राजाला बोलावण्याचा निर्णय घेतला. रामरतनला एकूण तीन मुले होती. त्यापैकी धाकट्या मुलाने […]

कालिदासाचा न्याय

भोज राजाच्या पदरी असलेला कालिदास चांगला कवी होताच. परंतु इतर कवी व कलावंतांचीही त्यालाचांगली कदर होती. गोरगरीबांनाही तो राजाकरवी मदत देई. एकदा एक दरिद्री शेतकरी कालिदासला भेटला व त्याने आपले दारिद्रय करण्याची विनंती केली. कालिदासाने दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात येण्यास सांगितले. मात्र, येताना रिकाम्या हाताने न येता राजासाठी ऐपतीप्रमाणे कोणतीही भेटवस्तू घेऊन ये, अशी सूचना केली. […]

हुशार नोकर

एक महापंडित होते. सर्व शास्त्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्या जोरावर त्यांनी अनेक सभा जिंकल्या होत्या. मात्र महापंडित असूनही राजा आपल्याला ‘राजगुरु’ करीत नाही, ही त्याची खंत होती. एकदा ते राजाकडे गेले व आपणास “राजगुरू” करावे म्हणून साकडे घातले. राजा म्हणाला. माझ्या तीन प्रश्रांची उत्तरे दिलीत तर मी तुम्हाला राजगुरू करीन. उत्तरे पटली नाहीत तर मात्र […]

1 2 3 4 5 6 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..