खेड्यात राहणारा सदाशिव हुशार व चुणचुणीत मुलगा होता. मात्र गरिबीमुळे त्याला फार शिकता आले नव्हते. आपल्या आईबरोबर तो छोट्या झोपडीत रहात होता. मोठा व्यवसाय करून श्रीमंत व्हायचे त्याचे स्वप्न होते. म्हणून शेजारच्या मोठ्या गावी जाऊन नशीब आजमवायचे ठरवून व तसे आईला सांगून त्याने घर सोडले. त्या गावी एक श्रीमंत सावकार होता. गरजू लोकांना तो कर्ज देतो, […]
संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी हे गुरू. अगदी लहानपणापासून एकनाथ जनार्दन स्वामींच्या आश्रमात राहत होते. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम ते अतिशय आवडीने, तातडीने आणि लक्ष देऊन करीत असत. त्यामुळे त्यांना दिलेले कोणतेही काम अगदी बिनबोभाट आणि व्यवस्थित होत होते. एकनाथांचे हे कामावरील प्रेम पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना आश्रमातील आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवण्याचे काम दिले होते. एकनाथ […]
भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे ‘नवरत्न’ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे. एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती […]
ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात. जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते. ते त्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे देखील त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. कोणतेही काम त्या-त्या वेळी पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतले होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत ते […]
एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे. आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. […]
इसापनीतीमधील ही एक कथा आहे. एकदा एका शेतकऱ्याने बुलबुल पक्ष्याचे गाणे ऐकले. ते त्याला इतके आवडले, की बुलबुलचे हे गाणे आपण कायम ऐकत राहावे असे त्याला वाटले. म्हणून त्याने त्या पक्ष्याला पकडायचे ठरवले. एके दिवशी रानात शेतकऱ्याने आपल्या पिकात जाळे लावले. बुलबुल पक्षी दाणे खायला म्हणून आला आणि नेमका त्या जाळ्यात अडकला. शेतकऱ्याने त्याला पकडून पिंजऱ्यात […]
प्रसिद्ध इतिहासकार अर्नार्ड टॉयन्बी एकदा परदेशात व्याख्यान देण्यासाठी गेले होते. आपला दौरा संपवून ते मायभूमीला जाण्यासाठी परत निघाले. बोटीचा प्रवास होता त्यामुळे वेळ लागणार होता. त्याच बोटीतून एक धर्मोपदेशकही प्रवास करीत होते. त्यांना समजले की टॉयम्बीदेखील याच बोटीत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून टॉयन्बीची ओळख करून घेतली. आणि मग उभयतांमध्ये विविध प्रश्रांवर चांगलीच साधकबाधक चर्चा झाली. […]
मूळची अमेरिकेची असलेली जोडी विल्यम्स हिने जेव्हा खाण कामगारांच्या समस्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिला खाणीमध्ये केल्या जाणाऱ्या भयानक स्फोटांचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटांमध्ये दरवर्षी जगात हजारो बळी जात असूनही प्रमुख राष्ट्रांचे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोडी विल्यम्सने ‘बॅन लॅण्डमाइन्स’ याच नावाने चळवळ सुरू केली. […]
कामावरील निष्ठा, चातुर्य आणि निर्भयता जवळ असली तर वेळप्रसंगी मृत्युसारख्या संकटावरदेखील मात करून मृत्यू टाळता येऊ शकतो. या संदर्भात मोगल बादशहा जहांगीर याच्यासंबंधीची एक हकिकत. […]
एकदा एका सरदाराने नाना फडणिसांना भोजनाचे निमंत्रण दिले. नानांना खूप करण्यासाठी त्या सरदारने भोजनाचा खास राजेशाही थाट ठेवला. आपण सरदार असल्यामुळे त्या कार्यक्रमात कसलीही कसर ठेवायची नाही हे त्यांनी आधीच ठरविले होते. […]