एक गरीब विणकर होता. त्याची त्याच्या कामावर अतिशय श्रद्धा होती. अतिशय मन लावून तो त्याच्या मागावर वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे तयार करायचा. थंडीचे दिवस आले म्हणून त्या विणकराने अतिशय परिश्रम घेऊन दोन कांबळ्या ( धोंगडीचा प्रकार) तयार केल्या. त्याच गावात एक अतिशय लबाड सावकार राहत होता. तो एकदा विणकराच्या घरावरून जात असताना त्याला त्या दोन कांबळ्या दिसल्या. […]
तुरुंगातील कैद्यांची पाहणी करण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली होती. एक निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे प्रमुख होते. या समितीने तुरुंगात जाऊन तेथील कैद्यांची पाहणी सुरू केली. सहज कुतूहल म्हणून समितीच्या प्रमुखांनी काही कैद्यांना त्यांनी कोणता गुन्हा केला व त्याला का शिक्षा झाली याची चौकशी करायला सुरुवात केली. एक कैदी म्हणाला, मी खरे तर कोणताच गुन्हा केला […]
भगवान युद्ध सत्य, अहिंसा आणि मोक्षमुक्तीचा मार्ग कसा मिळवायचा याची लोकांना शिकवण देत देत एका गावात आले. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. बुद्धांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या धर्माद्वारे सत्य, अहिंसा आणि मोक्षप्राप्तीचामार्ग सांगत आहात. परंतु मला सांगा, तुमची शिकवण ऐकून किती लोकांना मोक्षप्राप्ती झाली किंवा मुक्ती मिळाली. गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ते […]
फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला […]
एक राजा होता. आपल्या राज्यातील जनतेबाबत त्याला अतिशय काळजी होती. त्यामुळे जनतेच्या हितासाठी त्याचे सदैव प्रयत्न चालू असायचे. शिवाय हा राजा शब्दाला जागणारा होता. त्याच्या तोंडून कोणाला शब्द दिला गेला तर तो आपला शब्द खरा करून दाखविल्याशिवाय मुळीच राहायचा नाही. त्याचा प्रधानही अतिशय हुशार होता. त्यामुळे राजाचा राज्य कारभार सुरळीत चालू होता. एकदा राज्यात मोठा दुष्काळ […]
‘आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नीची साधनाताईंची फार मोलाची साथ लाभली होती. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या ‘साधने’त कोठेही खंड पडला नाही. साधनाताईंनीही अगदी मनापासून बाबांच्याप्रमाणेच या कार्यात स्वतःला वाहून घेतले. साधनाताई आमटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदू घुले. आमटे व घुले परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते. बाबा आमटे यांच्या कलंदर वृत्तीची साधनाताईंना प्रथमपासूनच कल्पना होती. परंतु चाकोरीबाहेर जीवन […]
राष्ट्रभक्तीची भावना प्रखर असली, की समोर मृत्यू जरी येऊन उभा राहिला तरी त्याची तमा नसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाकेल्या अनेक क्रांतिकारकांनी हे सिद्ध केले आहे. या राष्ट्रभक्तीला कशाचेच बंधन नसते. ना वयाचे, ना जातीचे, ना धर्माचे. खान्देशातील बाल शिरीषकुमारची कथा हेच सांगून जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाची […]
आपली प्रशंसा केलेली कोणाला आवडत नाही? उलट सर्वांनी सदासर्वकाळ आपली प्रशंसाच करावी असेच अनेकांना वाटत असते. परंतु अशा प्रशंसेमुळे गर्व निर्माण झाल्यास कधी कधी आपल्या कार्यात तो व्यत्यय आणू शकतो. म्हणून प्रशंसेला सहसा भुलून जाऊ नये. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे यांचे एक उदाहरण खूपच बोलके आहे. महात्मा गांधी यांची विचारसरणी प्रमाण मानून आचार्य विनोबा भावे यांनी […]
कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक – उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे […]
क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी […]