कथा
विमर्श कथा : १
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला […]
क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर कारातीर्थ
कारातीर्थ !!! क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीत जिथं स्थानबद्ध करून ठेवलं होतं, तो तुरुंग म्हणजे कारातीर्थ ! तुम्हा आम्हा सर्वांचे एक श्रध्दास्थान ! स्वातंत्र्यदेवतेचा धगधगता मानवी अवतार रत्नागिरीत जेथे राहून गेला , ती जागा म्हणजे, कारातीर्थ ! इंग्रजांना भाजून काढणारे आणि देशभक्तांना प्रेरणा देणारे विचारांचे अग्निलोळ जिथे अधिक प्रखर झाले ती जागा म्हणजे, कारातीर्थ! विधायक समाजसेवेचा […]
घास रोज अडतो ओठी
हॉलमध्ये तुफान गर्दी . सगळीकडे झगमगाट . फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलाय की टेलर ने वाकडी तिकडी कैची चालवून शिवलेल्या वस्त्राला फॅशन म्हणून स्वीकारलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन. परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट. काहींच्या तोंडी, त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा सुवास. हातात कुणीतरी कोंबलेला पेढा, सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना, […]
एक कृतज्ञ चोर
मी एक गरीब सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे. मी माझ्या पत्नीसह काही दिवस रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत,मुलीचे लग्न झाले आहे आणि ते ती कुटुंबासह दूरच्या शहरात राहतात. […]
प्रेमरंगी रंगताना
त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी . तिनं इकडे तिकडे पाहिलं . ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती . बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या . आणि सगळे चवीनं खात होते . ” उपमा विकणारा गेला का पुढच्या […]
बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ३
आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा. […]
जग दिसते तसे नसते
…. तेव्हा पिटुकल्या उंदराला समजले की बाहेरच्या जगात दिसते तसे नसते. […]
निंदकाचे घर असावे शेजारी
सोळाव्या शतकात रने देकार्त नावाचा एक थोर तत्त्वज्ञ फ्रान्समध्ये होऊन गेला. अतिशय बुद्धिमान असलेला देकार्त आपले तात्त्विक विचार त्याकाळी कोणालाही न भिता मांडत त्यामुळे काळातील असे. त्या कथासार धर्ममार्तंड व परंपरावादी मंडळी त्याच्यावर नेहमीच टीका करीत असत. कारण त्याचे आधुनिक विचार त्यांना पसंत नव्हते. देकॉर्नचे विचार जर लोकांना पटू लागले तर आपल्याला कोण विचारणार अशी भीती […]
मनाची श्रीमंती
उत्तर प्रदेशातला एका नदीच्या खोऱ्यातला एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाचे काही गुपित त्याने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्या मुलास सांगत असे, “अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या […]