नवीन लेखन...

शोध स्वतःचा

सकाळी उठल की लोक देवाच्या पाया पडतात आणि मी व्हॉटस्ॲपवर कुणाचा संदेश आला, ग्रुप वर काय चाललय, फेसबुकवर किती जणांनी माझ्या फोटोला लाईक दिले, काय आणि किती कंमेट आल्या हे बघतो. रात्री मोबाईल कितीही वेळ वाया घालवीन पण दिवसभर काम करुन थकलेली आई बोलली बाळा पाय दुखतायत दाबतोस का तर मला झोप येते. आईने छोट काम सांगितल की मला कंटाळा येतो. मला माझ्या अपयशाच खर कारण कळल होत. माझ कंटाळा करण, माझा आळशीपणा, माझ फेसबुक, व्हॉटस्ॲप, युटुब्यच व्यसन, आयुष्यतल्या वेळेचा अपमान, अतिहुशारी, अर्थ नसलेली बडबड. खरच मी आता स्वतःच्या नजरेत एका झटक्यात पडालो, माझी गरजच नाही कशाला जन्माला आलो हाच प्रश्न पडला. खरच घरात बसून असलेल्या मला खरतर घरातून बाहेर हकलल पाहिजे. तर आई बाबांच निस्वार्थ प्रेम मिळतय. कर्जाच्या बोझाखाली वाकलेले आणि लवकरच नोकरीपासून निवृत्त होणारे बाबा कधीच काय बोलले नाही. नको आपला भार आई वडलांना मरुया आपण हाच विचार डोक्यात फिरु लागला. […]

नात्यांची दुरुस्ती

मी: काय झालं साहेब ? पोलीस: मी तुम्हाला बायकोला विष देऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करतोय. […]

कठोर शिक्षा – भाग ४

“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला. सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला. “सावंत, त्या बाईना बोलवा.” यशवंतने इशारा केल्यावर एक मध्यम वयाची बाई आली. “या, यशोदा बाई.” यशवंतने सुरुवात केली. “हा हार तुमचा आहे कां?” यशवंतने तो हार यशोदाबाईला दाखवत प्रश्न केला. “माझा नाही.” यशोदाने उत्तर दिलं. “मग […]

वेदांग शिरोडकर

वेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता. […]

कठोर शिक्षा- भाग ३

“तुम्ही हे जहाल वीष कुठून आणि कसं मिळवत?” यशवंतने प्रशन केला. “मी ते माझ्या शाळेतून घेतलं. म्हणजे, मी ज्या शाळेत केमिस्ट्री हा विषय शिकवते, तिथून” रजनीने उत्तर दिलं. “मला नी़ट खुलासेवार सांगा. ” यशवंत. “या शाळेत मिस मलकानी नांवाची एक बाई स्टोर- इन चार्ज आहे. मी तिच्याकडे ते मागितलं. तिन मला सावधगिरीचा सल्ला देऊन कांहींशा नाखुषीनेंच […]

सावज

‘सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा  फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . […]

कठोर शिक्षा – भाग २

“ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं ! “मी तुमच्या गप्पांत सामिल होऊं कां?” मागून एक आवाज आला. “ओ हो, तुम्ही यशवंत दळवी ? बाळूच्या लग्नाला आलांत ? ” अरविंदने ओळख दाखवली.”तुम्ही मफ्तीमध्ये आलात म्हणून आधी ओळखलं नाही. ” “हे नारायण प्रभू- सुविख्यात वकील आणि ह्या […]

बेटी – धनाची पेटी ( सत्य घटनेवर आधारित एक लघुकथा )

नेहमीच्‍या कोपर्‍यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्‍या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्‍हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्‍या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्‍याच्‍या खेळकर स्‍वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्‍याचं […]

कठोर शिक्षा – भाग १

“अरे…..! तू नानू नां रे ?” कोणीतरी पाठीमागून हांक मारली आणि नानूच्या  पाठीवर थाप मारली. सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू)  प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात  (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता.  त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते […]

1 104 105 106 107 108 113
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..