काकड आरती
रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं. […]