हे माझ्या सदैव लक्षात राहील
माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्यापासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याचप्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे. […]