MENU
नवीन लेखन...

मिठाई

त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.” […]

९/९ विश्वास निवास

९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं. […]

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही? […]

1 111 112 113
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..