घर हरवलेला पोलीस
शासकीय विभागातच नाही तर खाजगी क्षेत्रातसुध्दा काही ठिकाणी कामकाज चोवीस तास चालू असतं. परंतु अशा क्षेत्रात आठ किंवा बारा तासांच्या शिफ्टमध्ये कामकाज चालतं. काही क्षेत्रात तर फक्त दिवसा काम चालतं. रात्री कार्यालयं बंद असतात. अनेक अशी सरकारी कार्यालयं आहेत, ज्या ठिकाणी जनतेशी निगडीत कामकाज चालतं, पण ते फक्त दिवसापुरतं मर्यादित असतं. […]