बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग
मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ? […]
मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ? […]
आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक. […]
माझी बदली औरंगाबादच्या ग्रामीण शाखेत झाल्यापासून ही पारव्याची जोडी दर महिन्याला एक तारखेला पेन्शन काढण्यासाठी येईल. आजोबा 70 च्या पुढे. बऱ्यापैकी थकलेले आणि आजी 60 च्या आतल्या. अगदी तरतरीत. आजी-आजोबांचा हात धरून त्यांना बँकेत आणत. त्यांना एका बाकड्यावर टेकवून लगबगीने पैसे काढण्याचा फॉर्म भरून रांगेत उभ्या राहात आणि कॅशिअरकडे त्यांचा नंबर आल्यावर ‘आवो’ असं जोराने ओरडून […]
बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती. […]
मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो टायपिस्ट म्हणून व निवृत्त झालो अधिकारी म्हणून. पूर्ण कारकिर्दीत पगाराच्या पाकिटातून आलेल्या नोटा सोडल्या तर मला ऑफिसमध्ये कधीही नोटा हाताळाव्या लागलेल्या नाहीत; असं मी सांगितलं तर जसा इतरांचा विश्वास बसत नाही त्याप्रमाणे तुमचाही बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, एवढं मात्र खरं. […]
आपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही. […]
संयम दिनूची ठिगळ लावलेली चड्डी आणि विरलेला शर्ट असला तरी त्याची भेगाळलेली पाटी स्वच्छ असायची. खिशात पेन्सिलचा एक इंचाचा एकच तुकडा. त्याचं अक्षर इतकं छान की त्याची गरिबी या रेखीव सौंदर्याने झाकून जायची. मधल्या सुट्टीत किशोर पेन्सिलच्या पैशात अर्धी लेमनची गोळी विकत होता. तेव्हा दिनू त्याची नजर चुकवून खिशातली पेन्सिल घट्ट धरत परत वर्गात जाऊन बसला. […]
त्या वर्षी अण्णांनी याच मैना च्यापटीत संपूर्ण धना. केला होता. त्याकाळी पाऊस भरपूर पडत होता निसर्ग हिरवागार दिसत होता. शेतीने हिरवा गार शालू परिधान केला होता इतका निसर्ग शोभून दिसत होता. कोकिळा आनंदाने झाडावर गात होती गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. […]
मी मुंबईत वांद्रे येथे एक सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. या शाखेचे बहुतांश ग्राहक अनिवासी भारतीय असल्याने ते लाखात कमी आणि कोटींमध्ये जास्त व्यवहार करायचे. त्यामुळे या शाखेत फसवणुकीचे (फ्रॉड) प्रकार नेहमी होत असत. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions