सूर्यास्ताची दिवाळी
बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती. […]