येळावीचा म्हातारा शेकोटीला आला…….।
शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत. […]