कथा
भुताचे बाप
गावदरीच्या वेताळ ओढ्यात दर अमावास्येला भुतं खेळतात हे साऱ्या पंचक्रोशीला माहीत आहे भुते खुर्द आणि भुते बुद्रुक अशा दोन गावांमधून हा वेताळाचा ओढा गेला आहे . पूर्वी अलीकडे म्हणजे डोंगर बाजूला असणारे भुते खुर्द हेच गाव होते पण ओढ्या पलीकडील शेती कसायला ओढा ओलांडून जावे लागे . कधी शेतात संध्याकाळी अंधारले की या ओढ्यातून अलीकडे यायची […]
इमारतींचं सौंदर्य
अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात आली आणि ते दृश्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. बागेतल्याच एका बाकावर बसून मी त्या इमारतीचं सौंदर्य शांतपणे न्याहाळू लागलो. बागेच्या समोरच्याच फुटपाथवर पाचसहा इमारतींचीं रांग दिसत होती. रांगेतल्या प्रत्येक इमारतीचं सौंदर्य खरोखरोच अप्रतिम होतं. युरोपियन पठडीतल्या बैठया घरांच्या शैलीतल्या त्या […]
गावाकडची गोष्ट – हिरा मावशी
मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत […]
गावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र
रेल्वे मध्ये कामाला लागण्या अगोदर मी बिगारी काम दुसऱ्याच्या शेतामध्ये करीत होतो. त्यात वडील वारलेले घरामध्ये पैशाची चणचण फार भासत होती.वडीलतरी या जगातून निघून गेले घर रिकामे झाले वडिलांचा आधार नाहीसा झाला. गेली कित्येक दिवस वडील अंथरुणावर पडून होते आधार होता तो आधार नाहीसा झाल्यामुळे. अखंड घर दुःखात बुडाले होते घरात मला अजिबात करमत नव्हते. सोबत […]
गाडी घुंगराची
अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. […]
नेस्ट रिटर्नड इंडियन्स
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लड, आखाती देश अशा जगभरातील अनेक ठिकाणी भारतातील युवा पिढी स्थिरावत असल्याचं चित्र आजकाल सहास पाहावयास मिळतं. भारतात एखादी पदवी हस्तगत करुन उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणं आणि नंतर तिथेच कामधंद्याच्या निमित्ताने स्थिरावणं हा जणू आजकालच्या युवापिढीचा शिरस्ताच बनून गेला आहे. मुंबई पुण्यातील जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील कुणीतरी परदेशात असतं असं म्हंटल तर ती अतिशयोक्ती ठरणार […]
छोटा पेग
मारुतराव चिकटे, वय अंदाजे चाळीस वर्षे, कोल्हापुरातल्या ‘चिकटे रेस्टॉरंट आणि बार’चे उंच पण तुंदिलतनु मालक. चिकटेमालक त्यांच्या ओळखीच्या मंडळीत सरनोबतवाडीतले मोठे ‘जबराट बिझनेसमॅन’ होते. बॉक-बॉक-बॉक-बॉक आवाज काढणाऱ्या बुलेट मोटरसायकलवरून ते रोज सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला येत असत. त्यांच्या शेताला लागूनच एक छोटासा जमिनीचा तुकडा रखमाबाई सरनोबत ह्या सत्तरी गाठलेल्या, अंगाची धनुकली झालेल्या म्हातारीच्या मालकीचा होता. […]
सुट्टी
सुट्टीचं नाव निघालं की छोटयांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटतात. सुट्टी म्हणजे आराम, सुट्टी म्हणजे रोजच्या धावपळीपासून सुटका, सुट्टी म्हणजे विरंगुळा ही समीकरणं सर्वांच्याच मनात रुजलेली असतात. रोजची कामे उरकत असताना देखील सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात सुट्टीच्या तारखेकडे. आठवडयात शनिवार रविवारच्या मध्ये एखाद्या आडवारी सुट्टी आली की तो आठवडा मजेत जातो. आणि शनिवार रविवारला लागून […]
गोष्ट त्या दोघांची
गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. […]