मोकळं आभाळ
पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये एफवाय बीए करणाऱ्या सोनालीला ट्रेकिंगचे वेड होते, पण आई बाबांचा तिच्या या छंदाला सक्त विरोध होता. मनिष आणि जयश्री या सुखवस्तू दांपत्याची ती एकुलती एक मुलगी. इतर मुलांसारखं तिने यूपीएससी करावं किंवा एनडीएची परीक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते भरपूर खर्चही करायला तयार होते. सोनालीचे सगळे मित्र पाचवीपासूनच बिझी झाले […]