कथा
बोनस
आठवी ‘ ब ‘ च्या वर्गातील त्या ” चौकडी ” चे डोळे भिंतीवरील घड्याळा कडे लागले होते..कधी एकदा त्या घड्याळात दोन चे ठोके पडतात आणि कधी मधली सुट्टी होते.!!!.. असं या चौघांना झालं होतं…. मधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. […]
लाईफ लाईन
एकतीस डिसेंबर ची रात्र, नवी दिल्ली मधल्या ग्रीन पार्क भागातील त्या क्लब मध्ये तरुणाईचा उत्साह आणि धुंद शिगेला पोहोचली होती, संगीताच्या तालावर आणि मदिरेच्या डोलावर थिरकणारी पावलं नववर्षाच्या स्वागताला प्रचंड उत्सुक होती, घड्याळाच्या काट्यांनी बारा ची वेळ दाखवताच हा उत्साह आणि जल्लोष आता परमोच्च बिंदू वर पोहोचला … […]
हॅप्पी न्यू Ear
रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं. […]
स्वर यात्री
पहाट….कसली मध्यरात्रच ती… तीन सव्वा तीन वाजले होते, ब्रेक चां कर्ण कर्कश आवाज करून बस एका ढाब्यावर थांबली, महत्प्रयासाने सुमारे तासा भरा पूर्वी लागलेली झोप मोडल्या मुळे चरफडत ‘ मानसी ‘ उठली आणि डोळे किलकिले करून तिने खिडकी बाहेर पाहिले, कुठला तरी ‘ दिलखुश इन’ नावाचा पंजाबी ढाबा ‘ दिसत होता. ” […]
बकासुराची गोष्ट
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत. […]
लंकादहन
रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले. […]
पोप आणि नोकर
अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता. […]
होळीविषयी लोककथा
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. […]
कहाणी आकाशदिव्यांची
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे. पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट. […]