अंधश्रद्धा निर्मूलन कायदा
“काका अंधश्रद्धा निमूर्लन विशेषांसाठी, अंधश्रद्धा निमूर्लनासंबंधी लवकरच सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कायद्याबाबत तुम्ही कायदेमंत्री चिंधड्यांची मुलाखत घेणार होता, त्याचे काय झाले?” रोजची पहाट या प्रख्यात दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट सूर्याजी रविसांडे यांनी त्यांचे मुख्य मुलाखतकार काका सरधोपट यांना कार्यालयात आल्या आल्या प्रश्न विचारला. “साहेब, त्यांच्या मुलाखतीसाठी तारीख मिळवता मिळवता अगदी नाकीनऊ आले. अखेर शेवटी उद्या सकाळी […]