नवीन लेखन...

वटपौर्णिमा (कथा)

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस […]

त्या रात्रीचा थरार

माणसाचं मन असंच असतं. प्रसंगी आकाशात झेपावणाऱ्या गरूडापुढे झेपावते तर कधी जमिनीवरून सरपटणाऱ्या सापासारखे जमिनीवरून सरपटते. सर्कशीतल्या वाघाला एका चाबकाच्या फटकाऱ्या बरोबर नाचायला लावणारे माणसाचे मनं एखादी पाल अंगावर पडली तरी क्षणात थरथरते. […]

पोलिसांची प्रतिमा

स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते. […]

असाही पोलिसांचा वापर… दृढ विश्वास पोलिसांवरचा

आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो. […]

गुन्हा कुणाचां? शिक्षा कुणा?

मी पोलीस खात्यात नोकरी करणारा अधिकारी असल्याने वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्या किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना माझ्यासाठी नवीन नव्हत्या किंवा त्याचं नाविन्य असं काही नव्हतं. […]

एकाकीपणा

पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. […]

पाटलाचा वाडा

गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता. […]

फार उशीर झालाय गं मम्मी !

— मी कुठं आहे तेच कळत नाही . शरीराची तडफड होते आहे . शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय . डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय. गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत . पब्लिकची गर्दी जाणवतेय . आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय . काहीतरी घडलंय . पब मधून येताना लाँग […]

सर्पदंश

सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत…. ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर […]

1 4 5 6 7 8 112
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..