नवीन लेखन...

गम्मत एका देवळातील

गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते. […]

कथा एका चावीची

जनतेची ही अपेक्षा चुकीची आहे, असं मला मुळीच म्हणायचं नाही. परंतु सर्वांच्याच समस्या पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविता येत नाहीत. काही तक्रारींमध्ये तांत्रिक अडचणी असतात. तर काही वेळेला कायद्याच्या बंधनामुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात. […]

अनुकरण

‘अनुकरण’ ह्या शब्दावर किंवा त्या शब्दाचा अर्थ काढून त्यावर आपणाला समाजामध्ये वाद-विवाद घालायचा नाही किंवा त्यावरती बाष्कळ चर्चासुध्दा करण्याची आवश्यकता नाही. पण ह्या अनुकरणांमधून समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये किती घातक परिणाम होताना दिसतात, त्यासाठी हा सर्व लिखाण प्रपंच करावा लागत आहे. […]

आणि प्रेत उठून धावू लागले

पोलीस खात्यात तशी नेहमीच मनुष्यबळाची वानवा असते. अनेक बंदोबस्त, तपास, कोर्ट, व्ही. आय. पी. इत्यादींचा मेळ घालता-घालता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रभारी हवालदार यांची कसरत चालू असते.
[…]

मैफील

गेली पंधरा मिनीटे ती पियानो वाजवत होती. वाजवता वाजवता ती मधेच थांबली.. तिने अचानक विचारलं….. ‘काही आठवलं का रे तुषार?’ […]

भेदभाव

पृथ्वीतलावर जीव सृष्टी निर्माण झाल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये पदोपदी भेदभाव दिसून येतो. मानवात तर तो अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतोच. परंतु मुक्या प्राण्यांमध्ये सुध्दा दिसतो. […]

पादुका

दरवर्षी पालखी गेल्यावर होते तशी शंकरराव व सुषमाताईंची अगदी सैरभैर अवस्था झाली. स्वामींवर त्यांच्या घराण्याची अतूट श्रद्धा..तीन पिढ्यांपासून. आज गेले चाळीस वर्षे स्वामींच्या पादुका तीन दिवस त्यांच्या घरी मुक्कामी असायच्या. ते तीन दिवस त्यांच्या घरी जणू उत्सव असायचा. दूरदूरवरुन नातेवाईक व आप्तेष्ट दर्शनाला यायचे..दर्शन घेउन तृप्त व्हायचे. […]

पार्क आणि हिरवळ

हल्ली मी सकाळी न चुकता पार्क मधे फिरायला जातोच…!! म्हणजे पूर्वीही जायचो.पण त्यात सातत्य नव्हतं..आता आहे. आता असं काय वेगळं घडलंय असे तुम्ही विचाराल ना? (विचारा हो..!! तसंही मी सांगणारच आहे तुम्हाला..) […]

बादशहा चोरीच्या गाड्यांचा

मोटार कार, दुचाकी, मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांत विलक्षण वाढ झाली होती. नियमितपणे वर्तमानपत्रांत गाडयाचोरी बाबत बातम्या ठळकपणे प्रसिध्द होत होत्या. मी, त्यावेळी ठाणे शहरात गुन्हे शाखेत नेमणूकीस होतो. सन – १९९८ ते २००० या वर्षांत खंडणी विरोधी पथकात असतांना एका चकमकीमध्ये माझ्या डाव्या हाताला गोळी लागून जखमी झालो होतो. […]

अंतराळातील अश्वत्थामा

मी आणि अय्यर जिवश्‍चकंठश्‍च मित्र होतो. आता होतो असंच म्हणायला हवं. कारण अय्यर आता हयात नाही. नाही तरी कसं म्हणावं? कदाचित असूही शकेल. असला तरी देखील तो मला आणिमी त्याला या पृथ्वीतलावर भेटू शकणार नाही हे मात्र निश्‍चित. […]

1 5 6 7 8 9 112
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..