नवीन लेखन...

कोडं

काळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय… […]

गच्ची

गच्चीवर जाणं प्रत्येकाच्याच आवडीचं असलं तरी त्याचं अप्रूप मात्र तळ-मजल्यापासून जसं वर-वर उंच जावं तसं कमी होत जातं .. तळातल्या लोकांचं गच्चीत कधीतरीच जाणं होतं म्हणून त्यांना जास्त ओढा असतो आणि वरच्या मजल्यावरच्यांसाठी तर गच्ची म्हणजे अगदी “उठण्या-बसण्यातली “. […]

पहिलं प्रेम

हातात हात घेऊन युगुल रंकाळ्यावर … गुलाबी हवा … गुलाबी थंडी … गुलाबी विचार … दोघांच्या मनाचं पार “जयपूर” झालेलं .. जुन्या आठवणी ,किस्से , गमती-जमती … गप्पा सुरु. […]

जोकर

कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो … आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं. […]

“सूर “जुने”.. ध्यास नवा”

“ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”.. […]

तो चंद्रप्रकाश

आम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता. […]

बारक्या

आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !! […]

ग्रॅन्टरोडचा रेड लाईट

हिला कुठेतरी पाहिले आहे… लक्षात नाही आले… मी लांबूनच तिला बघत होतो…बघत बघत जवळ येऊ लागलो… ती म्हणाली ..पहेचाना .. मी असेच उत्तर दिले… कैसी हो..आप? […]

उम्मीद पर दुनिया कायम है

आता हे गेल्यावर्षीचं कोरोना प्रकरण बघा ना !!.. बिचारी इतकी निर्दोष माणसं मारली गेली .. इतके संसार उद्ध्वस्त झाले .. अगदी जगभर .. पण तुम्ही-आम्ही अजून जगतो आहोतच ना ? धक्क्याने गेलो नाही .. कारण हीच “उम्मीद” […]

1 68 69 70 71 72 112
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..