तिची गोष्टच वेगळी
मी म्हणालो तुम्हा मुलींचे खूप लक्ष असते सगळ्यांकडे . तशी ती हसली म्हणाली , जसे तुम्हा पुरुषांचे मुलींकडे , स्त्रियांकडे असते तसे आमचेही. तिच्या माझ्यात जवळ जवळ २५ वर्षाचे अंतर. शेजारीच रहात होती. आम्ही चाळीत रहात असल्यामुळे थंडीत ऊन खायला सकाळी बाहेर असायचो कधी रविवारी तर कधी बँक हॉलीडेला. […]