नवीन लेखन...

वृक्षारोपण !

जगन्या शिपाई माणूस. तरी त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे काम होते. साहेबांच्या हातून वृक्षारोपणा करावे, हि सूचना त्यानेच मांडली होती आणि अपेक्षे प्रमाणे ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. वृक्षारोपणाच्या तयारीची जवाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली! […]

मी मदत करू ? (लघुकथा)

कवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून,  तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे […]

यावर्षीच्या दिवाळीत…

“कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून, रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला. […]

पानगळीचे दिवस (कथा – सांगोपांग : ४)

तसं पाहायला गेलं तर ही कथा एका चौकोनी कुटुंबाची , उपनगरातील एखाद्या ब्लॉकमध्ये घडणारी आहे. पण मांडणी करताना त्या फ्रेममध्ये दरवेळी बाह्य जगातील संदर्भ येत जातात आणि मग ती कथा एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता अनेकांची होऊन जाते. निष्पर्ण वृक्षाबद्दलचं प्रेम , आपुलकी मनात उगवत जाते आणि पानगळीचे दिवस सुसह्य होऊन जातात. […]

प्रश्नोपनिषद (कथा – सांगोपांग : ३)

आजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती. सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं. त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं . प्रश्नोपनिषद […]

अनपेक्षित (कथा – सांगोपांग : २)

जी कथा लिहिताना , लिहिल्यानंतर आणि आजही वाचताना मी खूप अस्वस्थ होतो ती कथा म्हणजे अनपेक्षित. समाजातील अशा प्रकारच्या वृत्ती असणाऱ्यांच्या भविष्यकाळाच्या जाणिवेनं मन सुन्न होतं. आणि ते स्वाभाविकच आहे , नाही का ? तुम्हाला काय वाटत ? कळवा मला. […]

ड्रॉवर (कथा – सांगोपांग : १)

कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते . आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते. […]

कथा – सांगोपांग

वाटलं , आपण आपल्याच काही निवडक कथांकडे अलिप्तपणे पाहिलं तर … त्या कथांचा सांगोपांग विचार केला तर… लेखन करताना , कथा प्रसिद्ध झाल्यावर , त्यावर वाचकांचा प्रतिसाद लाभल्यावर जसा आनंद मिळत होता , तसा आता इतक्या वर्षांनी , जरा वेगळ्या पद्धतीने कथांकडे पाहिल्यावर आनंद मिळू शकतो. तोच हा प्रयत्न आहे. कथा सांगोपांग ! […]

मोरूचा बाप, मोरुला म्हणाला …

मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’ […]

1 82 83 84 85 86 112
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..