आभाळाचे खांब : २
दादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं. […]